बापरे..महिलेच्‍या पोटात निघाला सात किलो वजनाचा गोळा

बापरे..महिलेच्‍या पोटात निघाला सात किलो वजनाचा गोळा
बापरे..महिलेच्‍या पोटात निघाला सात किलो वजनाचा गोळा
Published On

रावेर : एका २५ वर्षीय विवाहितेच्या पोटातून तब्बल ७ किलो वजनाचा गोळा यशस्वीरीत्या काढण्यात येथील संजीवन हॉस्पिटलचे डॉ. चंद्रदीप पाटील यांना यश आले आहे. महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. (jalgaon-news-lump-weighing-seven-kilos-went-into-the-woman's-stomach)

पाडळा (ता. रावेर) येथील रुखसाना तडवी या महिलेचे पोट अधूनमधून दुखत असे. महिलेने खानापूर येथील डॉ. सुरेश पाटील यांच्याकडे उपचार घेतले. औषधानंतर थोडे दिवस बरे वाटत असे पण नंतर पुन्हा पोट दुखू लागले. दरम्यान, बाळंतपणात महिलेच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. येथील संजीवन हॉस्पिटलचे डॉ. चंद्रदीप पाटील यांनी महिलेची सोनोग्राफी करून तपासणी केली असता तिच्या पोटात मोठा गोळा असल्याचे दिसून आले.

बापरे..महिलेच्‍या पोटात निघाला सात किलो वजनाचा गोळा
सावधान..सॅनिटायझरमध्ये वापरले जातेय जीवघेणे मिथेलॉन

चार तास शस्त्रक्रिया

अखेर गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ अशी तब्बल ४ तास शस्त्रक्रिया करून हा ३२० मिलिमीटर बाय २०५ मिलिमीटर आकाराचा व ७ किलो वजनाचा गोळा यशस्वीरीत्या काढण्यात डॉक्टरांना यश आले. हा मोठा मांसल गोळा महिलेच्या गर्भाशयाजवळील बीजांडाजवळ होता. त्यामुळे बीजांडासह गोळा बाहेर काढण्यात आला आहे. यावेळी डॉ. चंद्रदीप पाटील आणि अनास्थेशीया सर्जन डॉ. निलेश पाटील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com