रुग्णसंख्या कमी, पण जळगावसह चार तालुक्यांत पुन्हा संसर्ग

रुग्णसंख्या कमी, पण जळगावसह चार तालुक्यांत पुन्हा संसर्ग
coronavirus
coronavirus
Published On

जळगाव : गेल्या आठवड्यात जळगाव शहरासह केवळ भुसावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण होते. मात्र, आठवडाभरात भडगाव, चोपड्यासह जळगाव ग्रामीणमध्ये नवीन बाधित आढळून आल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांमध्ये संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (jalgaon-news-Low-number-of-corona-patients-but-re-infection-in-four-talukas-including-Jalgaon)

coronavirus
Nandurbar : सारंगखेडा घोडेबाजारात कोरोना नियमांचा फज्जा

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात जुलै, ऑगस्टपासून कोरोनाची (Corona) दुसरी लाट नियंत्रणात येऊ लागली. ऑक्टोबरमध्ये ती पूर्ण नियंत्रणात आली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीनंतर लाट येणार असे सर्व अंदाज फोल ठरले. गेल्या आठवड्यापर्यंत जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर व भुसावळ (Bhusawal) तालुका वगळता अन्य तालुक्यांत एकही रुग्ण नव्हता. सर्वच तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, गेल्या पाच- सहा दिवसांत भडगाव, चोपडा, जळगाव ग्रामीण, अमळनेर याठिकाणी पुन्हा एकेक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे तालुक्यांमधील संसर्गाची चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात ९ सक्रिय रुग्ण असून पैकी ४ रुग्ण जळगाव शहरात तर अन्य भुसावळ, भडगाव, चोपडा (Chopda) व जळगाव ग्रामीण आदी ठिकाणी प्रत्येकी एकेक रुग्ण आहे.

चाचण्या वाढल्याच नाहीत

राज्यात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटच्या संसर्गाचा धोका वाढलेला असताना जळगाव जिल्ह्यात जानेवारीअखेर ते फेब्रुवारीच्या सुरवातीपर्यंत तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा टास्क फोर्सने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दररोज दोन हजारांवर चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना अद्याप जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढलेली नाही. अर्थात, गेल्या आठवड्यात दिवसाला अडीच- तीनशे चाचण्या होत होत्या. त्यांची संख्या दोन दिवसांपासून काहीशी वाढून सात-आठशेपर्यंत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com