Crop Insurance : खरीप हंगामातील पीकविम्याचा लाभ अद्याप मिळेना; आठ महिने उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Jalgaon News : राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरु केली आहे. नुकसान भरपाई म्हणून पिकांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. त्यानुसार खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

जळगाव : खरीप हंगामात पीक विमा उतरविला असताना पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होती. परंतु अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांच्या विम्याचा लाभ आठ महिन्यांपासून मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लोकशाही दिंडीच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत कैफियत मांडली. 

राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरु केली आहे. अर्थात निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानी भरपाई म्हणून पिकांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. त्यानुसार खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यात निसर्गाच्या लहरीपणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते. 

Crop Insurance
Amravati Airport : अमरावतीवरून मुंबईसाठी पहिल्या विमानाचे बुकिंग फुल्ल; या दिवशी होणार उड्डाण

१६ गावातील शेतकऱ्यांचे झाले नुकसान 

अमळनेर तालुक्यातील १६ गावांतील शेतकऱ्यांना अद्याप खरीप पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मका आदी पिकांचा समावेश होता. अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून खरीप पिकांची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि काढणीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडे मागणी केली होती.

Crop Insurance
Narayangad Lake : दहा गावांची तहान भागवणारा नारायणगड तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे संकट

तहसीलवर मोर्चा काढत दिले निवेदन 
दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याची रक्कम १६ गावांतील शेतकऱ्यांना आठ महिन्यांपासून मिळालेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लोकशाही दिंडी काढत तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com