सौरऊर्जेतून तब्‍बल पाच कोटी ६४ लाख युनिट वीज!

सौरऊर्जेमुळे खानदेश वीजनिर्भरतेच्‍या वाटेवर
solar energy
solar energy
Published On

जळगाव : विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी यात युनिट मागे वाढणारे वीज दरांमुळे बिलांचा बसणारा शॅाक. यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या (Solar Energy) वापरावर भर दिला जात आहे. यामुळेच घरांवर सोलर पॅनल उभारण्यावर भर दिला जात आहे. या करिता महावितरणकडून देखील अनुदान दिले जात असते. यामुळे गेल्‍या वर्षभरात खानदेशात तब्‍बल चार हजार ५७८ जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे. यामधून पाच कोटी ६४ लाख युनिट वीजनिर्मिती करून ‘महावितरण’ ला (Mahavitaran) देत आहेत. (jalgaon-news-Khandesh-on-the-path-to-electricity-dependence-due-to-solar-energy)

solar energy
बागल कुटुंबाने फाेडला टाहाे; शेजारील घरात ओमचा सापडला मृतदेह

गेल्या वर्षभरात इंधनाचे दर वाढले आहेत. शिवाय अधूनमधून कोळशाचा तुटवडा देखील जाणवत असतो. यामुळे अनेक भागामध्‍ये महावितरणकडून भारनियमन केले जाते. वीज पुरवठा खंडित झाला तर काही वेळ देखील राहू शकत नाही; अशी आजची स्थिती झाली आहे. यामुळे वीज गेल्यानंतर घरात अडचण होऊ नये; यासाठी इन्व्हर्टरचा पर्याय आला. मात्र आता याला देखील पर्याय म्हणून अक्षय ऊर्जा असलेल्या सौरऊर्जेवरील उपकरणांचा वापर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घराच्या छतावर ‘फोटो व्होल्टाईक पॅनल’ उभारून सौर वीज ‘नेटमीटरिंग सिस्टिम’ द्वारे महावितरणच्या लोकल फिडरमध्ये साठविता येते. त्या बदल्यात रात्री ‘महावितरण’ ची वीज घ्यावी, वीज साठविण्यासाठी बॅटरीची गरज भासत नाही. हे पॅनल देखील गेल्या दोन- तीन वर्षात बहुतांश घरांवर लावलेले पाहण्यास मिळत आहेत.

‘महावितरण’ला दिली पावणे दोन कोटी युनिट

नेटमीटरिंग सिस्टिमद्वारे महावितरणच्या लोकल फिडरमध्ये साठविता येते. त्या बदल्यात रात्री ‘महावितरण’ ची वीज घेता येते. यानुसार सोलर पॅनलद्वारे निर्मित होणारी वीज वापरल्‍यानंतर शिल्‍लक राहणारी वीज ही महावितरणला दिली जाते. खानदेशातून अशा प्रकारे गेल्‍या वर्षभरात एक कोटी ८६ लाख ११ हजार ५०० युनिट वीज महावितरणला दिली आहे. या बदल्‍यात रात्रीच्‍या वेळी तीन कोटी ११ लाख ४३ हजार ५१० युनिट वीज महावितरणकडून घेतली आहे.

खानदेशात साडेचार हजाराहून अधिक पॅनल

घराच्या छतावर फोटो व्हॉल्टाईक पॅनल उभारून सौर वीज नेट मिटरींगद्वारे महावितरणच्या लोकल फिडरमध्ये साठविता येते. असे खानदेशातील चार हजार ५७८ जणांनी घरांवर पॅनल बसवून ते सौर उर्जेद्वारे महावितरणला वीज देणारे ग्राहक बनले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन हजार ७१४, धुळ्यात एक हजार २८२ आणि नंदुरबार जिल्ह्यात ५८२ जणांनी पॅनल बसविलेले आहेत. सौरऊर्जेचे हे प्रस्थ वर्षागणिक वाढत आहे. तीन वर्षांपूर्वी सौर पॅनल वापरणारे केवळ ५३५ ग्राहक होते.

४० टक्‍केपर्यंत अनुदान

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार आहे. तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे. रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com