बागल कुटुंबाने फाेडला टाहाे; शेजारील घरात ओमचा सापडला मृतदेह

या प्रकरणाचा अधिक तपास तुळजापूर पोलिस करीत आहेत.
om bagal
om bagal
Published On

- कैलास चाैधरी

तुळजापूर : तालुक्यातील सांगवी मार्डी (sanghjvi mardi) येथे एका बालकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ओम मनोज बागल (om bagal) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच तुळजापूर (tuljapur) पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह पोलिस कर्मचा-यांना घटनास्थळी धाव घेतली.

ओम गुरुवारी दुपारी गोळी आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. ब-या वेळानंतर तो घरी न आल्याने कुटुंब भयभीत झाले. सर्वांनी त्याची शाेधाशाेध सुरु केली. रात्रभर शोधून देखील ताे काेणालाच सापडला नाही.

om bagal
एसपींच्या आवाहनानंतरही महा आक्रोश मोर्चावर गाेर सेना ठाम

आज (शुक्रवार) सकाळी ओमच्या घराशेजारील असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ओमच्या दोन्ही कानात सोन्याची बाली होत्या. त्या कानावर नव्हत्या. त्याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी श्वान पथक आले आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी चाैकशी करीत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com