आतापासून नऊच्या आत घरात; ‘थर्टीफर्स्ट’ सेलिब्रेशन घरातच

आतापासून नऊच्या आत घरात; ‘थर्टीफर्स्ट’ सेलिब्रेशन घरातच
Thirty first celebration
Thirty first celebration

जळगाव : ‘थर्डीफर्स्ट’ अर्थात ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा रात्री नऊनंतर जमावबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहे. यामुळे यंदाही ‘थर्डीफर्स्ट’ घरातच साजरा करावा लागणार आहे. यामुळे तळीरामांच्या आनंदावर विरजणच पडले आहे. गतवर्षीही कोरोनाच्या निर्बंधांमुळे हॉटेल्स, बिअरबार, ढाबे यांना थर्टीफस्टच्या रात्री होणाऱ्या व्यवसायाला तिलांजली द्यावी लागली होती, यंदाही ती द्यावी लागणार आहे. (jalgaon-news-In-a-house-within-nine-from-now-on-Thirtyfirst-celebration-is-at-home)

Thirty first celebration
जळगाव जिल्‍ह्यात पावसाळी वातावरण; जोरदार वाऱ्याने दादर पडली

कोरोना (Corona) महामारीने गेल्या दोन वर्षांपासून सर्वांनाच पछाडले आहे. कोरोना विविध व्हेरियंटच्या स्वरूपात येत आहे. अगोदर कोरोनाचा मूळ प्रकार, नंतर डेल्टाप्लस व आता ओमिक्रॉन अशा नावाने कोरोना रूप पालटत आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राज्यातच रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

आतापासूनच पोलिसांची गस्‍त

थर्टीफस्ट (Thirty First celebration) डिसेंबरची रात्र म्हणजे तळीरामांसाठी एक पर्वणी असते. थर्टीफस्टनिमित्त अनेक मोठी हॉटेल्स, ढाबे, बिअरबार चालक विविध स्पर्धा, विविध प्रकारचे ‘शो’ आयोजीत करत ग्राहकांना आकर्षित करून आपला व्यवसाय करून घेतात. मागील वर्ष निर्बंधामुळे थर्टीफस्ट डिसेंबरची रात्र साजरी करता आली नाही. यावर्षीतरी चांगला व्यवसाय मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम हॉटेल्स व्यावसायिकांनी आयोजीत केले होते. मात्र, कालपासूनच पोलिस (Police) कोरोना निर्बंधाचे कारणे देत बिअर शॉप, हॉटेल्सवर रात्री दहानंतर गस्त घालून बंदची सक्ती केली जात आहे. जमावबंदी असल्याने ग्राहकांना एका ठिकाणी बसता येणार नाही, नियमांचे उल्लंघन होईल. यामुळे सर्वच हॉटेल्स चालकांनी रात्री नऊच्या आतच मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यावर भर दिला आहे.

महसूल बुडेल

रात्री नऊनंतर जमावबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे (Jalgaon Collector) आदेश आहेत. काही ठिकाणी पोलिस नऊनंतर बंद करताहेत. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे रात्री नऊनंतर वाईन शॉप बंद करा असे आदेश नाहीत. यामुळे वाईन शॉप चालकांमध्ये संभ्रम आहे. ३१ डिसेंबरला जर नऊनंतर बंद ठेवले तर अवैध मद्यविक्री अधिक होण्याची शक्यता आहे. शासनाने याबाबींचा विचार करून रात्री नऊनंतर बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जळगाव डिस्ट्रीक्ट वाईन मर्चंट असोसिएशनचे सचिव पंकज जंगले यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com