Jalgaon News: मुक्‍ताईनगरात पुन्‍हा पकडला अवैध गुटखा; खडसे पोहचले पोलिस स्‍टेशनला

मुक्‍ताईनगरात पुन्‍हा पकडला अवैध गुटखा; खडसे पोहचले पोलिस स्‍टेशनला
Muktainagar Jalgaon News
Muktainagar Jalgaon NewsSaam tv

मुक्ताईनगर (जळगाव) : मुक्‍ताईनगर तालुक्यातील अवैध गुटखा वाहतुकीसह विक्री होत असल्याची मोठी चर्चा आहे. अशात आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुटखा तस्करीचा मुद्दा उपस्थित केला असतांनाच आज पुन्हा एकदा अवैध गुटखा वाहतूक करणारी ट्रक पकडल्याने मोठी (Muktainagar) खळबळ उडाली आहे. हा गुटखा लाखो करोडोंच्या घरात असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (Letest Marathi News)

Muktainagar Jalgaon News
JDCC Bank: ‘राष्ट्रवादी’त पवारांची बंडखोरी; जिल्हा बँकेत ‘राष्ट्रवादी’ला धक्का, संजय पवार अध्यक्षपदी

पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मुक्‍ताईनगर शहरातून वाहतूक होत असल्याचे गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या अगोदर मुक्ताईनगर येथील चौकात २६ लाखाचा गुटखा पकडला होता. तर आता ट्रक मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुली जवळील उड्डाण पुलाखाली पकडले. यात राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. याचे मूल्य ५६ हजार असले तरी अवैध बाजारात विक्रीची किंमत करोडो रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार खडसे पोलिस स्‍टेशनमध्‍ये

गुटखा पकडल्याची माहिती मिळताच विधान परिषदचे आमदार एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये येऊन कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई केली म्हणून अभिनंदन केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com