Jalgaon : पर्यटनासाठी शिमल्याला गेली ती परतलीच नाही; बसवर दरड कोसळल्याने जळगावची तरुणी ठार

Jalgaon News : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. यातच डोंगरावरून अचानक घसरलेले दगड प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसवर कोसळले
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : हिमाचल प्रदेशातील शिमला येथे फिरण्यासाठी गेलेल्या जळगावमधील तरुणीचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिमलाच्या रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान- तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसराजवळ बसवर दरड कोसळल्याने यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून यामध्ये जळगावातील सिंधी कॉलनीतील एका तरुणीचा समावेश आहे. घटनेचे वृत्त कळताच कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 

जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी लक्ष्मी विराणी (वय २५) यांचा या घटनेत मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यातच डोंगरावरून अचानक घसरलेले दगड एका खासगी बसवर कोसळल्याची घटना हिंदुस्तान- तिबेट मार्गावरील बिथल येथे घडली असून या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला.  

Jalgaon News
Washim Accident : रस्ता ओलांडताना सायकलस्वार मुलीला ट्रॅव्हल्सने उडवले; मुलीचा जागीच मृत्यू

बसवर कोसळलेल्या दगडांमुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृत महिलांमध्ये जळगावच्या लक्ष्मी विराणी यांचा समावेश आहे. घटनेनंतर त्वरित पोलिस व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी प्रवाशांना खानरी (रामपूर उपजिल्हा) येथील महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्रात तत्काळ दाखल केले. मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवला आहे. 

Jalgaon News
OBC Rasta Roko : ओबीसी समाज उतरला रस्त्यावर; औंढा- जिंतूर मार्ग रोखला, वाहनांच्या मोठ्या रांगा

वडील, काका रवाना

लक्ष्मी विरानी या तुषार लाइट हाउस व भगवती लाइट महलवालेचे संचालक रामचंद्र विरानी यांच्या कन्या, तर तुषार विरानी यांची भगिनी आहेत. घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन, तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी तातडीने संपर्क साधला. तर घटना माहिती झाल्यानंतर कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. तर लक्ष्मी यांचा मृतदेह आणण्यासाठी त्यांचे वडील व काका शिमलाकडे रवाना झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com