Jalgaon News: सोशल मीडियावरील मैत्री, तरुणी तिथेच फसली; लग्नाचं वचन देऊन तरुणाने केलं भलतंच कांड

सोशल मिडीयावर फ्रेंडशीप; लग्नाचे आमीष देत घरात येवून तरुणीवर अत्‍याचार
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ वर्षीय तरुणीशी फेसबुकवर फ्रेंडशीप केली. यानंतर (Jalgaon) तिच्यावर घरात घुसून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Live marathi News)

Jalgaon News
Samruddhi Mahamarg Accident: लघुशंकेसाठी थांबणं जीवावर बेतलं, समृद्धी महामार्गावर ३ विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबियांसह वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीची ओळख इद्रिस खाटीक नावाच्या तरुणाशी फेसबुकवर झाली होती. डिसेंबर २०२२ मध्ये दोघांची भेटही झाली. इद्रिसने तिच्या घराचा शोध घेत ती घरात एकटी असताना शिरकाव केला. लग्नाचे आमीष देत या तरुणीशी सलगी करुन तिच्या ईच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापीत केले. दुसऱ्यांदाही तरुणी घरात एकटी असताना भामट्याने घरात येवुन मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले.

Jalgaon News
Nandurbar News: धडगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस; घरांचे मोठे नुकसान

फोटो व्‍हायरल करायची धमकी

पिडीतेने लग्नाच्या बोलणीसाठी तगादा लावल्यावर संशयीताने टाळाटाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे पिडीतेने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने संशयिताने तिचे फोटो (Social Media) सोशल मिडीयावर अपलोड करण्याची भिती दाखवुन वारंवार अत्याचार केले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर तरूणीने पालकांना घडला प्रकार सांगितला. पिडीतेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली महाजन यांनी जबाब नोंदवुन घेत संशयीत इंद्रीस खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com