Jalgaon News: विवाह झाला..देवदर्शनावरून परतले; नवदाम्‍पत्‍य रूममध्‍ये गेले अन्‌ तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली

विवाह झाला..देवदर्शनावरून परतले; नवदाम्‍पत्‍य रूममध्‍ये गेले अन्‌ तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली
Jalgaon News Marriage
Jalgaon News MarriageSaam tv
Published On

जळगाव : ॲरेंज मॅरेज करण्यापेक्षा आता वैवाहिक संबंधासाठी शेकडो ऑनलाइन साइट उपलब्‍ध आहेत. त्यातून लग्‍नाच्‍या गाठी बांधल्या जात आहेत. मात्र यातून फसवणूक (Fraud) झाल्‍याचे प्रकारही समोर आले आहेत. असाच प्रकार (Jalgaon) जळगावात समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री झाल्‍यानंतर (Marriage) लग्‍नाची मागणी..तरूणी कडून लग्‍नास होकार मिळतो व थाटात लग्‍नही होते. परंतु, लग्‍नानंतर धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. आपण जिच्यासोबत लग्न केलं ती महिला नाही, तर तृतीयपंथीय असल्याचे समोर आल्यानंतर तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. (Tajya Batmya)

Jalgaon News Marriage
Shiv Sena MLA Split: शिंदे गटातील ८ ते १० आमदार फुटणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

तृतीयपंथी असताना मुलगी असल्याची बतावणी करून विवाह करणाऱ्या तृतीयपंथीविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी (ता. ५) दिले. हा धक्कादायक प्रकार न्यायालयीन निवाड्याने समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर थेट विवाहाचा निर्णय अंगाशी कसा येऊ शकतो, याबाबत विचार करायला लावणारा हा प्रकार आहे.

Jalgaon News Marriage
Samruddhi Mahamarg: भीषण अपघातानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर; सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून गैरसोय केली तर कारवाई

१५ दिवसातच उरकला विवाह

जळगाव शहरातील कांचननगर चौगुले प्लॉटमधील मूळ रहिवासी शुभम संजय पाटकर (वय २६) खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १४ मार्च २०२३ ला शुभम मोबाईलवर खेळत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवर दिव्या पाटील नावाने मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. ती त्याने स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये विचारांचे आदानप्रदान होऊन अवघ्या १५ दिवसांत दोघांनी लग्नाचा बार उडवून दिला. नवरा मुलगा शुभम पाटकर याच्या वाढदिवसाचा मुहूर्त पाहून परिचितांच्या उपस्थितीत हा विवाह झाला.

Jalgaon News Marriage
Nandurbar News: वाढत्या प्रदूषणामुळे सातपुड्यातील नद्या होताय नष्ट

..अन्‌ पायाखालची जमीन सरकली

लग्नानंतर नवदांपत्याचे देवदर्शन झाले. सर्व विवाह संस्कार पांरपरिक पद्धतीने झाले. पाटकर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला असतानाच अचानक त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पाटकर कुटुंब आणि नातेवाइकांनी नवदांपत्याच्या मधुचंद्राची तयारी केली, खोली सजविली. जोडपे आत गेल्यावर पत्नी म्हणून शुभमने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, दिव्याने मला त्रास होतोय, असे सांगून शिव्या देत त्याला खोलीबाहेर काढले. लग्न करून आणलेली व्यक्ती मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर पाटकर कुटुंबीयांना धक्का बसला व त्यांनी मदतीसाठी पोलिस ठाणे व न्यायालयात धाव घेतली. पीडित कुटुंबीयांकडून ॲड. केदार भुसारी यांनी न्यायालयात तक्रार केली.

गुन्हा दाखल करण्याचे आदेश

घडल्या प्रकाराबाबत शुभम पाटकर व कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांसह रामानंदनगर पोलिसांत लेखी फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर संशयित दिव्याबाबत उपलब्ध पुरावे आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, सोशल मीडियावरील संशयिताच्या गैरवर्तनाचे दस्तऐवज अशांसह न्यायालयात दाद मागितली. प्रथम वर्ग न्यायाधीश आर. वाय. खांडरे यांच्या न्यायालयाने पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com