Anil Patil : खानदेशातून अनेक माजी मंत्री, आमदार राष्ट्रवादीत येतील; आमदार अनिल पाटील यांचा दावा

Jalgaon News : अनेकजण राष्ट्रवादीत येणार असून सगळेच नाव आत्ताच सांगण्यात अर्थ नाही. मात्र तीनही जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नेते, पदाधिकारी हे राष्ट्रवादीशी जोडलेले दिसतील
Anil Patil
Anil PatilSaam tv
Published On

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात अनेक जण माझ्या संपर्कात असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यात प्रामुख्याने धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमधील माजी मंत्री, माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य असे अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील; असा मोठा दावा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.

जळगावच्या पारोळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे कार्यकर्त्यांसह लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आज जिल्ह्यात आहे. यावर बोलताना आमदार अनिल पाटील यांनी अनेकजण राष्ट्रवादीत येणार असून सगळेच नाव आत्ताच सांगण्यात अर्थ नाही. मात्र तीनही जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नेते, पदाधिकारी हे राष्ट्रवादीशी जोडलेले दिसतील; असं सुद्धा अनिल पाटील यांनी म्हटले आहे.

Anil Patil
Jalna Crime : जुना वाद उफाळला; लोखंडी पाईपने बेदम मारहाण, चारजण जखमी

महाविकास आघाडीला देणार मोठा झटका 

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या पूर्वी अजित पवार हे महाविकास आघाडीला मोठा झटका देणार असल्याचा दावा देखील अनिल पाटील यांनी केला आहे. तर राज्यातील अनेक नेते सुद्धा हे अजित दादांच्या संपर्कात आहेत. सुनील तटकरे यांच्या संपर्कात असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक नेते कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले दिसतील, असा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Anil Patil
Accident News : नातेवाईकांकडे जाताना काळाचा घाला; गाडीच्या धडकेत पिता- पुत्राचा मृत्यू, आई- मुलगा गंभीर

पवार कुटुंब एकत्र येण्यावर मोठे वक्तव्य 

शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील असा दावा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे; यावर आमदार अनिल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कि पवार कुटुंब आजपर्यंत तरी आम्हाला दुरावलेला कुठेही दिसलेलं नाही. विविध संस्थांमध्ये काम करताना त्यांनी एकत्र येणं स्वाभाविक आहे. मात्र याचा अर्थ ते भविष्यात एकत्र येऊ शकतात; असा अर्थ आतातरी लावणे आता चुकीचे आहे. एकत्र येत असतील आणि परत राष्ट्रवादीची ताकद वाढत असेल. आमच्या नेतृत्वाने ठरवलं असेल तर आमची हरकत असण्याचे कारण नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com