Jalna Crime
Jalna CrimeSaam tv

Jalna Crime : जुना वाद उफाळला; लोखंडी पाईपने बेदम मारहाण, चारजण जखमी

Jalna News : क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून आला. यामुळे जुन्या वादाचा राग मनात धरून लोखंडी पाईपने आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीमध्ये तीन ते चार जण जखमी झाले
Published on

अक्षय शिंदे 

जालना : गावातील दोन परिवारांमध्ये जुना वाद आहे. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने यात काही जणांनी लोखंडी पाईप व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना जालन्यातील जामखेड येथे घडली आहे. या मारहाणीत तीन ते चारजण जखमी झाले आहे. दरम्यान मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे दोन परिवारांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद आहे. क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून आला. यामुळे जुन्या वादाचा राग मनात धरून लोखंडी पाईपने आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीमध्ये तीन ते चार जण जखमी झाले आहेत. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Jalna Crime
Accident News : नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; २० जण जखमी

पाच जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान घटना घडल्यानंतर याप्रकरणी काकासाहेब कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यामध्ये संशयित पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी एकाच गावातील असून जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत हातातील लोखंडी पाईप आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Jalna Crime
Rajgad Fort : राजगड किल्ल्यावर रात्रीत उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा; पुरातत्व विभागाकडून पुतळा हटवत साहित्य जप्त

तरुणावर कोयत्याने वार 

अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. अक्षय थेटे या तरूणावर जिवघेणा हल्ला करण्यात आल्याने सोनई शहरातील नागरिक धास्तावले आहेत. मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला. याचे कारण समोर आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत वाढली असून पोलीसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com