Erandol Vidhan Sabha : भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील नॉटरीचेबल; एरंडोल- पारोळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी

Jalgaon News : जळगावच्या एरंडोल- पारोळा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. दरम्यान महायुतीत या मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी
Erandol Vidhan Sabha
Erandol Vidhan SabhaSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्ह्यात बंडखोरी करत महायुतीची डोकेदुखी वाढली होती. जळगाव शहर मतदारसंघासह एरंडोल. चोपडा मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली होती. दरम्यान आज माघारीचा शेवटचा दिवस असून एरंडोल- पारोळा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करणारे भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे सकाळपासूनच नॉटरीचेबल आहेत.

जळगावच्या (Jalgaon) एरंडोल- पारोळा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. दरम्यान महायुतीत या मतदारसंघाची जागा (Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेले ए.टी. पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आज माघारीचा शेवटचा दिवस असून आज सकाळपासून ए.टी. नाना पाटील यांचा मोबाईल स्विच ऑफ असून ते जिल्ह्याच्या बाहेर असल्याची माहिती मिळत आहे. 

Erandol Vidhan Sabha
Amalner News : दुचाकीला कट लागल्याचा राग; बेदम मारहाणीत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

माजी खासदारांची पुढची भूमिका काय?
भाजपचे पक्षश्रेष्ठी हे ए. टी. नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र ए. टी. पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने माघारी होणार किंवा नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. परिणामी शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेतात की निवडणूक लढविण्यावर ठाम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीची चिंता वाढणार आहे.

Erandol Vidhan Sabha
Balasaheb Thorat News : महायुतीचे भ्रष्ट्र सरकार घालवणे हा महाविकास आघाडीचा उद्देश आहे; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात

चोपड्यात दोघांची माघारी 

चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत बारेला व माजी आमदार जगदीश वळवी यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. आज माघारीच्या दिवशी दोघांनी माघार घेतल्याने आता याठिकाणी ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे व शिंदे गटाचे प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यात सरळ लढत राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com