अजिंठ्यात धावत्या बसला आग..प्रसंगावधानाने प्रवाशी सुखरूप

अजिंठ्यात धावत्या बसला आग..प्रसंगावधानाने प्रवाशी सुखरूप
St Bus
St BusSaam tv

तोंडापूर (जळगाव) : जगप्रसिद्ध अजिंठा घाटाच्या वर चढताच एसटी महामंडळाच्या मुक्ताईनगर-औरंगाबाद बसने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी (ता. २४) घडली. प्रसंगावधान राखत (St Bus) बसमध्ये प्रवास करीत असलेल्या सुमारे ५६ प्रवाशांना सुखरुप खाली उतरविण्यात आले. (jalgaon news fire broke out in Ajanta Passengers were safe due to occasion)

St Bus
भाजपने लावले कंदील; लोडशेडींग विरोधात आघाडी सरकारचा निषेध

प्रसंगावध राखत बसमधील सुमारे ५६ प्रवाशी बसच्‍या खाली उतरल्याने सुदैवाने सुखरूप असून पोलीस व ग्रामस्थांनी टँकरच्या साह्याने आगीस आटोक्यात आणले आहे. (Muktainagar) मुक्ताईनगर डेपोची एसटी बस मुक्ताईनगर– औरंगाबाद (एमएच १४ बीटी १६ ५ २ ) ही एसटीबस सुमारे ५६ प्रवाशी घेऊन सुमारे ४:३० वाजेच्या सुमारास अजिंठा घाट चढून वरती आली असता पोलीस वायरलेस वळणा जवळ चालकाच्या कॅबिन मध्ये अचानक पेट घेतला. सुदैवाने प्रवाशी बसच्या खाली तत्काळ उतरल्याने सुखरूप बचावले असून पुढील अनर्थ टळला.

शॉर्ट सर्किट होऊन आग

घटनेची माहिती मिळताच साह्ययक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, बिटजमादार अक्रम पठाण, संजय ब्राम्हणदे यांच्यासह ग्रामस्थानी टँकरने आग आकोट्यात आणली. बॅटरी बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी; असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी सोयगांव आगाराचे डेपो मनेजर व सिल्लोड आगारातील डेपो मनेजर यांनी बसचा पंचनामा करून बस आकाश डाब्याबर लावण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com