
जळगाव : इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावे सरकार एक पाऊल पुढे आलेय; आता टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला. (jalgaon-news-Don't-make-it-to-the-end-Deputy-Chief-Minister-ajit-pawar-warning-to-ST-employees)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात ओबीसी समुदाय हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला डावलून चालणार नाही. केंद्राने इम्पिरिकल डेटा दिला नाही. म्हणून अडचण आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्हाला सन्मान असून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपला यश कुठे आले
विधानपरिषद निवडणुकीच्या भाजपला यश मिळाले असे म्हणता येणार नाही. कारण ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार यापूर्वीही निवडून येत होते; तेच यावेळीही निवडून आलेत. फक्त महाविकास आघाडीची मते एका ठिकाणी फुटली, ती का फुटली याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.