आमचे सरकार शब्‍द फिरविणार नाही; उपमुख्‍यमंत्री पवार यांची शेतकरी निर्णयावर ग्‍वाही

आमचे सरकार शब्‍द फिरविणार नाही; उपमुख्‍यमंत्री पवार यांची शेतकरी निर्णयावर ग्‍वाही
ajit pawar
ajit pawar
Published On

जळगाव : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. दोन निर्णय घ्यायचे राहिले आहेत. कोरोना आल्‍यामुळे ते राहिले आहेत. परंतु, कोरोना (Corona) गेल्‍यानंतर राज्‍याचे आर्थिक परिस्‍थीती पुर्वपदावर आल्‍यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी सांगितल्‍याप्रमाणे राहिलेल्‍या दोन्‍ही निर्णयांची घेणार, आम्‍ही शब्‍द बदलणार नाही; अशी ग्‍वाही उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बोलताना दिली. (jalgaon-news-Deputy-Chief-Minister-ajit-Pawar-statement-on-farmers-decision-in-state-government)

ajit pawar
टोकाची भुमिका घ्यायला लावू नका; एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्‍यमंत्र्यांचा इशारा

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण आणि दूध प्रक्रिया प्लांटचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil) उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse)अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, महापौर जयश्री महाजन, आमदार लता सोनवणे आदी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी, संचालकांवर संस्‍थेची सुबत्‍ता अवलंबून

दूध प्रक्रीया प्‍लांटच्‍या लोकार्पणप्रसंगी उपमुख्‍यमंत्री पवार यांनी म्‍हणाले, की दुधाचा धंदा हा कष्‍टाचा आहे. त्‍याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. बऱ्याचदा चुकीच्‍या मॅनेजमेंटमुळे संघ रसातळाला गेल्‍याचे पहायला मिळते. मात्र तेथील लोकप्रतिनिधी, संचालक कशाप्रकारे संस्‍था चालवितात. यावर त्‍या संस्‍थेची पत अवलंबून असते. आर्थिक सुबत्‍ता यावी याकरीता जिल्‍हा बँक चांगली चालायला हवी. शेतकरीला कर्ज उपलब्‍ध करून द्यायला हवे. या दृष्‍टीनेच राज्‍य सरकारने वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com