Girish Mahajan News: कापसाच्या भावाबाबत पंधरा दिवसात निर्णय; मंत्री गिरीश महाजन

कापसाच्या भावाबाबत पंधरा दिवसात निर्णय; मंत्री गिरीश महाजन
Girish Mahajan News
Girish Mahajan NewsSaam tv

जळगाव : कापूस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस (Cotton) पडून आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाव वाढवून देण्याबाबत आपण कॅबीनेटमध्येही प्रश्‍न उपस्थित केला होता. केंद्रांकडे त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत कापूस दराबाबत (Cotton Price) निर्णय होईल; असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केले. (Latest Marathi News)

Girish Mahajan News
Dombivli News : डोंबिवली ठाकुर्ली परिसरात भटक्या श्वानांची दहशत, संगोपन केंद्रातील श्वानांच्या भुंकण्याने रहिवासी हैराण

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रांतील सरकारला व नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी उपस्थित होते.

Girish Mahajan News
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे उर्वरित आमदार, खासदारही फुटणार; शिंदे गटाने आखला नवा प्लान

जिल्‍ह्यात पोलिस आयुक्‍तालय

श्री. महाजन म्हणाले, कि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता, जिल्ह्यात (Police) पोलीस आयुक्तालय उभारण्याबाबत आपण आग्रही आहोत. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावाही करीत आहोत. त्याला लवकरच मंजूरी मिळून येत्या दोन महिन्यात जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल.

Girish Mahajan News
Sangli Crime News: घरातील वस्तू चोरी गेल्याचा राग, वहिनीने केली लहान दिराची हत्या; भयानक घटनेनं सांगली हादरली

भाजपतर्फे जनसंपर्क अभियान : आमदार सावरकर

दरम्यान, भाजपचे आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ३१ मे ते ३० जूनपर्यंत जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत घरोघरी जावून जनतेला केंद्रातील सरकारच्या कामाची माहिती देण्यात येईल. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे जनसंपर्क अभियान राबवतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com