तहसीलदारांचे खाते हॅक.. ‘पीएम किसान’च्या परस्पर नोंदी

गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयात पीएम किसान संर्दभातील नोंदी थांबविण्यात आल्या होत्या. तरी देखील ३८ नोंदी झाल्या कशा? या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला. हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Cyber Crime
Cyber Crime
Published On

यावल (जळगाव) : तालुक्यातील किनगाव येथे एका सेतू सुविधा केंद्रचालकाने थेट यावल तहसीलदारांचे ‘पीएम किसान’ खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-cyber-crime-news-Tehsildar-account-hacked-and-Mutual-records-of-PM-Kisan)

तहसील कार्यालयातील लिपिक दीपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून तहसील कार्यालयात त्यांच्याकडे तहसील सहाय्यक म्हणून कामकाज आहे. त्या अनुषंगाने ते मागील दोन वर्षांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज पाहत आहेत. य योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी करणे (रजिस्ट्रेशन), आधारकार्डवरील नाव दुरुस्ती करणे, चुकीचा खाते क्रमांक असल्यास तो दुरुस्त करणे, शेतकऱ्यांचे शिवार बदल करणे आदी कामे ते ऑनलाइन पीएम किसानच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसीलदारांच्या आदेशाने करत होते. मात्र, १४ ते ३० सप्टेंबर या कलावधीत तहसीलदार महेश पवार यांच्या सूचनेवरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळाचे लॉगीन व आयडी त्यांना तहसीलदार महेश पवार यांच्या परवानगीनेच उपलब्ध व्हायचे म्हणून ते देखील बंद होते.

सप्‍टेंबरच्‍या शेवटच्‍या पंधरवाड्यात प्रकार

दरम्यान, १४ ते ३० सप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असताना या पीएम किसान संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या बाबत थेट तहसीलदार महेश पवार यांना विचारणा केली. तेव्हा तहसीलदारांच्या लॉगीन आय-डी या पोर्टलवर परवानगीशिवाय संकेतस्थळ हॅक करून ललित नारायण वाघ (रा. किनगाव, ता. यावल) यांना कोणतेही अधिकार नसताना ३८ शेतकऱ्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले. या प्रकरणी वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करीत आहेत.

Cyber Crime
धक्‍कादायक..नात्‍याला काळीमा, बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पूर्वीही नोंदी केल्याचा संशय

पैसे घेऊन पीएम किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे आपण आपल्याच कर्मचाऱ्यांवर संतप्त होत काम सद्या बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ३८ नोंदी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावून त्यांचे जबाब घेतले असता नोंदणीसाठी किनगाव सेतू सुविधा केंद्रात प्रत्येकी एक हजार रूपये घेतल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकारात महसूल प्रशासन बदनाम होते, असे तहसीलदार पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com