Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

Cyber Crime: वीजबिल अपडेट करण्याच्या नावाने वृद्धाची फसवणूक

वीजबिल अपडेट करण्याच्या नावाने वृद्धाची फसवणूक
Published on

जळगाव : वीजबिल अपडेट करण्याच्या नावाखाली रेल्वे कॉलनीमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त वृद्धाला सायबर ठगाने एक लाख ७५ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा (Cyber Crime) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

Cyber Crime
Aurangabad News : माता-पित्याच्या कलहाने मुलीचे केले वाटोळे; बालविवाह प्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील रेल्वे कॉलनी येथे गोविंद ईश्वरदास पाराशर हे कुटुंबासह वास्तव्यास असून, २०१५ मध्ये तापी पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गुरुवारी (१९ जानेवारी) त्यांना दुपारी एक अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. ‘तुमचे वीजबिल भरलेले आहे; पण ते अपडेट झालेले नाही. तुम्हाला लिंक पाठविली जाईल. नंतर ॲप डाउनलोड करावे’, असे कॉलवरील व्यक्तीने पाराशर यांना सांगितले.

ॲप डाउनलोड करताच बँकेतून रक्‍कम गायब

त्याप्रमाणे पाराशर यांनी ॲप डाउनलोड केले. मात्र, काही वेळानंतर त्यांना बँक खात्यातून २५ हजार रुपये कपात झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला. त्यांनी लागलीच बँकेत जाऊन विचारपूस केल्यावर नेट बँकिंगद्वारे कुणीतरी एक लाख ७५ हजार रुपये वळते करून घेतले असल्याचे समोर आले. अखेर शुक्रवारी पाराशर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com