फेसबुकचे फोटो डाऊन लोड करुन बनावट खरेदीखत

फेसबुकचे फोटो डाऊन लोड करुन बनावट खरेदीखत
फेसबुक
फेसबुक

जळगाव : फ्लॅट विक्रीचा तोंडी बोलणी झाली असतांना टेाकन बेण्यावर घराचा ताबा घेवुन फेसबुकवरील फोटो डाऊन लोड करून त्याद्वारे खोट्या कागदपत्राच्या अधारे फ्लॅट खरेदीची बनावट सौदापावती करण्यात येवुन फसवणूक केल्याप्रकारणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-cyber-crime-facebook-acount-photo-downloan-and-land-sell)

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात पुजा हरीष झंवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुणा आणि त्यांचे पती हरीष रामचंद्र झंवर( दोन्ही रा. मारवाडी गल्ली पाळधी ता. धरणगाव) यांच्या मालकीचा पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक ३३ येथील एसएमआयटी महाविद्यालयाजवळील वासू कमल अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये दिनेश रामचंद्र ऊर्फ रमेशचंद्र तिवारी हा आपल्या परिवारासह राहतो. २४ जुलै रोजी दिनेश तिवारी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुजा झवर आणि हरीष झंवर यांच्याविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यात झंवर दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर आज (ता.२० सप्टेंबर) रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तिवारीसह इतर सात जणांविरोधात तक्रार दिली.

फेसबुक
महापौर पदाचा पदभार स्वीकारताच कर्पे दुसऱ्या दिवशी ऍक्शन मोडमध्ये

बनावट सौदापावती

दिनेश रामचंद्र उर्फ रमेशचंद्र तिवारी व त्याची पत्नी लिलाबाई दिनेश तिवारी यांना हरीष झंवर यांच्या मालकीचा फ्लॅट विकत घ्यायचा होता. या फ्लॅटवर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेचा ३० लाख ४७ हजार ६८५ रूपयांचा आणि १० लाख रूपये एसबीआय बँक यांचा बोजा आहे. तिवारी दाम्पत्याने या फ्लॅटसाठी कोणताही लेखी सौदापावती केलेली नव्हती. फक्त तोंडी आणि काही लाखात सौदा ठरलेला होता. यासाठी तिवारी यांनी १ हजार रूपयाचे टोकन आणि काही पैसे गुगल पे ने काही रक्कम इंवर यांना दिले होते. परंतू असे असतांना दिनेश रामचंद्र ऊर्फ रमेशचंद्र तिवारी, त्याची पत्नी लिलाबाई तिवारी, प्रकाश शामलाल कटारीया (रा. सेंट्रल फुले मार्केट जळगाव), अतुल अशोक खरे (रा. जोशीपेठ), निलेश सुभाष पाटील (रा. कुंभारी सीम ता. जामनेर), प्रेमसिंग विश्वसिंग पाटील (रा. देवपिंप्री ता. जळगाव) आणि बिरज इंद्ररचंद्र जैन (रा. आदर्श नगर जळगाव) यांनी इंवर दाम्पत्याचे फेसबुकवरील फोटोच्या आधारे आणि बनावट कागदपत्रे घेवून खोटी सौदापावती तयार केली. त्याद्वारे इंवर दाम्पत्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी झंवर दाम्पत्याने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवूणक झाल्याची आणि खोटा गुन्हा केल्याची तक्रार दिली. पुजार झंवर यांच्या तक्रारीवरून तिवारी दाम्पत्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com