जळगाव : विद्युत विभागात अधिकारी असल्याची बतावणी करून वीज बिल भरण्याच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून ३ लाख ९८ हजार ९९९ रूपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news cyber crime 4 lakh extended by taking bank account information in light bill name)
भुसावळ (Bhusawal) शहरातील मल्टिस्पेशातील हॉस्पीटलचे संचालक डॉ. समीर खानापुरकर यांच्या मोबाईलवर २३ आणि २४ जानेवारीला एक मॅसेज आला. त्यात ईलेक्ट्रिसीटी ऑफीसर रोहित असे नाव सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना एक लिंक (Online Fraud) पाठविली. लिंक ओपन करून डॉक्टरांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी यांच्या बँकेची सर्व माहिती दिली. समोरील रोहित नावाच्या व्यक्तीने दोघांच्या (Cyber Crime) खात्यातून सुमारे ३ लाख ९८ हजार ९९९ रूपये परस्पर काढून घेतले.
सायबर पोलिसात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धाव घेवून रोहित नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव (Jalgaon) सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.