दिलासादायक..रुग्ण संख्‍या घटल्याने जळगावातील कोविड सेंटर बंद

दिलासादायक..रुग्ण संख्‍या घटल्याने जळगावातील कोविड सेंटर बंद
Covid Center
Covid Centersaam tv

जळगाव : कोरोनाची तिसरी लाट आल्‍यानंतर महिनाभरापुर्वी सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल नसल्‍याने सेंटर (Covid Center) बंदचा निर्णय घेण्यात आला. (jalgaon news covid Center closed due to declining number of patients)

Covid Center
वाळू माफियांनी पोखरली नदी; पात्रात खोदले शेकडो खड्डे

जानेवारी महिन्‍याच्या सुरूवातीला कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) पसरली. यामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढायला सुरूवात झाली होती. शहरात एक हजारापर्यंत रूग्णांची संख्या वाढली होती. दोन आठवडे रूग्ण वाढले. त्या अनुषंगाने (Jalgaon Corporation) महापालिकेने १० जानेवारीपासून अभियांत्रिकी वसतिगृहात महाविद्यालयातील कोविड़ केअर सेंटर सुरू केले होते. गेल्या महिनाभरात (Corona) कोविड सेंटरमध्ये ६०० रूग्ण दाखल झाले होते.

आता मोहाडी रूग्णालयात व्‍यवस्‍था

गेल्या महिनाभरात कोविड सेंटरमध्ये ६०० रूग्ण दाखल झाले. मात्र रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात येत होते. त्यामुळे सेंटरमध्ये रूग्णांची कमी झाली. यात रविवारी एकही रूग्ण नसल्याने महापालिका प्रशासनाने कोविड सेंटर सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल व्हायचे असेल अशा रूग्णांसाठी मोहाडी रूग्णालयामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com