Jalgaon: रेशन दुकानांवर लागणार ‘सीसीटीव्ही’; काळ्या बाजाराला लगाम

रेशन दुकानांवर लागणार ‘सीसीटीव्ही’; काळ्या बाजाराला लगाम
Ration Shop
Ration ShopSaam tv
Published On

जळगाव : रेशन दुकानांतून लाभार्थी स्वस्त दरात धान्य घेतात. यामुळे त्यांना संसाराचा गाडा ओढताना मदत होते. असे असले तरी रेशन दुकानातील (Ration Shop) धान्याचा काळा बाजार होतोच. त्यावर आळा बसावा यासाठी लवकरच सर्व रेशन दुकानांमध्ये (CCTV) सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. (Jalgaon News Ration Shop CCTV)

Ration Shop
स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीस पेन्शनसाठी फिरवाफिरव; दीड वर्षापासून वयोवृद्धेची मारताय फेऱ्या

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात १९५४ रेशन दुकाने आहेत. त्यातील ३५७ रेशन दुकानांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रेशन दुकानदारांच्या बैठकाही पुरवठा विभागाने घेतल्या आहेत. ‘आयएसओ’ नामांकन मिळविण्यासाठी विविध अटी, नियम आहे. त्या अनुषंगाने रेशन दुकानदारांनी तयारी सुरू केली आहे. मानांकनासाठी निवड झालेल्या रेशन दुकानदारांनी दुकानांना व बाहेरील परिसराला रंगरंगोटी देण्याची कामे सुरू केली आहे. दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, अंत्योदय रेशन कार्डधारक, प्राधान्य कुटुंबातील गार्डधारकांची संख्या, त्यांना मिळणारे धान्य, त्याचा दर आदींबाबत फलक मोठ्या अक्षरात तयार करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. सोबतच रेशन दुकानातील मालाचे आवक-जावक रजिस्टरचीही नोंद ठेवण्यात येत आहे. दुकानांचे रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने तयार करून ते स्वच्छ कसे राहील, याची दक्षता घेण्यात येत आहे. सूचना फलक, अभिलेख नमुने चांगल्या पद्धतीने ठेवण्यात येत आहे. जेणेकरून मानांकन तपासणीसाठी येणाऱ्या ‘टीम’ला ते दाखविताना काही त्रुटी त्यात राहणार नाहीत.

दुकानदारांची तपासणी सुरु

पुरवठा विभागाच्या पुणे उपायुक्तांकडून उपलब्ध झालेली पीपीटी, विहित नमुने सर्व तालुका कार्यालयांना देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावरील अभिलेख स्वच्छता पूर्ण झाली आहे. संचिका तपासणी आणि वर्गवारी काम सुरू आहे. तिच स्थिती तालुका कार्यालयांची आहे. आयएसओ मानांकनासाठी सहभागी झालेल्या दुकानदारांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये दुकानदारांनी केलेल्या तयारीचा आढावा संबंधित तालुक्यांचे तहसिलदार घेणार आहेत.

‘आयएसओ’ दुकाने अशी

जळगाव -३०, एरंडोल- २६, धरणगाव- २६, जामनेर- ४०, भुसावळ- २५, बोदवड- १०, यावल- २५, रावेर -२५, मुक्ताईनगर -१०, पाचोरा- २१, चाळीसगाव- ४२, भडगाव- ६, अमळनेर- २५, पारोळा- २५, चोपडा- २०, एकूण--३५७

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com