स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीस पेन्शनसाठी फिरवाफिरव; दीड वर्षापासून वयोवृद्धेची मारताय फेऱ्या

स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीस पेन्शनसाठी फिरवाफिरव; दीड वर्षापासून वयोवृद्धेची मारताय फेऱ्या
Jalgaon Chalisgaon News
Jalgaon Chalisgaon NewsSaam tv
Published On

मेहुणबारे (जळगाव) : अमृत महोत्सवी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असतांना दुसरीकडे स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियाची परवड मात्र सुरूच आहे. प्रशासन आणि बँकेच्या अनास्थेमुळे वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील स्वातंत्र्य सैनिकाच्या वयोवृद्ध पत्नीस राज्स सरकारच्या पेन्शनसाठी तब्बल दीड वर्षापासून खेटा माराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आहे. (Jalgaon Chalisgaon News)

Jalgaon Chalisgaon News
Crime News: दोन मित्रांनी मिळून केली मित्राची हत्या

वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील (Jalgaon News) रहिवासी कै. भावसिंग दोधू पाटील यांनी गोवा राज्य स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. गोवा स्वातंत्र्यानंतर त्यांनी उरळी कांचन (पुणे) येथे जिल्हा परिषद (Zilha Parishad) शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षकदानाचे कार्य केले. साहित्यीक, शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची अवघ्या महाराष्ट्रात ओळख होती. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. महाराष्ट्रात ते भा.दो. पाटील या नावाने परिचीत होते. शिक्षण दान कार्यात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला होता.

कुटंब झाले हातबल

पतीच्या मृत्युनंतर श्रीमती सुनंदा पाटील ह्या गेल्या दीड वर्षापासून वारस या नात्याने पेन्शन मिळावे; म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व उरळी कांचन येथील स्टेट बँक शाखेत खेटा मारत आहेत. मात्र संबंधीत विभागाच्या टोलवाटोलवीमुळे त्या पेन्शनपासून वंचीत आहेत. आज सुनंदा पाटील यांचे वय 80 वर्षाचे आहे. त्या वरखेडे येथे वास्तव्यास आहेत. त्या लकवा (पॅरालिसीस) या आजाराने त्रस्त आहेत. एकीकडे देश स्वातंत्र्य लढ्याला यंदा 75 वर्षे होत असल्याने अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी करत असतांना दुसरीकडे मात्र राष्ट्रपतींचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीस पेन्शन मिळवण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून शासन दरबारी व बँकेत खेटा माराव्या लागत असल्याच्या प्रकाराने स्वातंत्र्य सैनिक (कै.) भा. दो.पाटील यांचा मुलगा ज्योतिसिंग पाटील यांनी खेद व्यक्त केला आहे. ज्योतिसिंग पाटील हे गेल्या दीड वर्षापासून आईचे पेन्शन मिळावे. यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खेटा मारत आहेत. मात्र याबाबत दाद पुकार होत नसल्याने हतबल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com