रेशनकार्डसाठी लाच; खासगी पंटर गजाआड

रेशनकार्डसाठी लाच; खासगी पंटर गजाआड
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : जुने व जीर्ण झालेले रेशनकार्ड नवीन बनवून देण्यासाठी ४०० रुपयांची लाच घेणाऱ्या खासगी तरुणाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. लाचखोरीच्या या साखळीतील मोठा मासा मात्र नेहमी प्रमाण अलगद निसटला आहे. (jalgaon news Bribe for ration card Private Punter arrested)

Jalgaon News
वीज चोरी प्रकरणी २७ जणांवर गुन्हा

भोलाणे (ता. जळगाव) येथील २८ वर्षीय महिलेचे रेशनकार्ड जुने व जीर्ण झाल्याने नव्याने दुय्यम नवीन प्रत मिळण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयात अर्ज घेऊन तक्रारदार गेले होते. त्याठिकाणी खासगी व्यक्ती पराग पुरुषोत्तम सोनवणे (वय ३९, रा. खोटेनगर, जळगाव) याने रेशनकार्डची दुय्यम प्रत हवी (Bribe) असेल तर ४०० रुपयांची मागणी केली.

चारशे रूपयांसाठी अडकला

तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागात याबाबत रीतसर लेखी तक्रार केली. पोलिस (Police) उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने तक्रारीची खात्री केल्यावर निरीक्षक एन. एन. जाधव, निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाट, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने सापळा रचून संशयित खासगी पंटर पराग सोनवणे याला ४०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com