बंद करा..बंद करा..लोडशेडींग बंद करा; भाजपचा जनआक्रोश मोर्चा

बंद करा..बंद करा..लोडशेडींग बंद करा; भाजपचा जनआक्रोश मोर्चा
Jalgoan BJP
Jalgoan BJPSaam tv
Published On

जळगाव : राज्‍यभरात सध्या होत असलेल्या भारनियमनाच्‍या विरोधात तसेच नियमीतपणे वीज पुरवठा व्हावा; या मागणीसाठी आज भाजपच्‍यावतीने (BJP) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. (jalgaon news BJP Janakrosh Morcha against load shedding)

Jalgoan BJP
चॉकलेटचे अमिष दाखवत चिमुकलीवर अत्‍याचार; 60 वर्षीय नराधमाचे कृत्‍य

भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वाखाली जळगाव (Jalgaon) जिल्‍हाधिकारी कार्यालयावर भव्‍य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पक्षाचे सर्व नेते ट्रॅक्टरवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले. मोर्चात सहभागी सर्वांनी राज्‍य सरकार विरोधात तसेच राज्‍यात होत असलेल्‍या भारनियमनामुळे महावितरण (MSEDCL) विरोधात घोषणाबाजी करत सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणी केली.

तर सर्व रस्‍ते जाम करणार : आमदार महाजन

राज्‍यात भाजपचे राज्य असतांना एक तास सुध्दा लोडशेडींग झाले नाही. आता मात्र राज्यावर विजेचे संकट कोसळले आहे. यामुळे शेतकर्‍यांना आता आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय नसल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली. तर दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास सर्व रस्ते जाम करणार असल्याचा इशारा देखील आमदार महाजन यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com