Electric Shock
Electric ShockSaam tv

आईच्‍या दशक्रीयेपुर्वीच कुटूंबावर संकट; विजेच्‍या धक्‍क्‍यातून मुलगा बचावला पण..

आईच्‍या दशक्रीयेपुर्वीच कुटूंबावर संकट; विजेच्‍या धक्‍क्‍यातून मुलगा बचावला पण..
Published on

जळगाव : आजीच्या दशक्रीया विधीसाठी भुसावळला गेलेल्या तरूणाला घराच्या समोरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत तारेला हाताचा धक्का लागला. यावेळी जवळ उभ्‍या असलेल्‍या वडीलांनी प्रसंगावधान दाखविल्‍यामुळे मुलगा (Jalgaon News) बचावला. परंतु यात गंभीर जखमी होवून त्याचा उजवा हात कायमचा निकामी झाला आहे. (jalgaon news bhusawal boy survived the electric shock but right hand damage)

Electric Shock
Beed: गर्भपाताच्या औषधाची अवैध विक्री; बोगस मेडिकल चालकावर गुन्हा

भुसावळ (Bhusawal) येथील रहिवाशी केशव भाईदास पाटील हे कुटुंबियांसह पुण्यात वास्तव्याला आहे. त्याची आई सुमन पाटील यांचे २१ जूनला निधन झाले होते. ३० जूनला दशक्रिया विधी असल्याने केशव पाटील त्यांची पत्नी आणि अथर्व पाटील हे भुसावळ येथे थांबून होते. या दरम्‍यान २९ जूनला दुपारी दशक्रीया विधीच्‍या कार्यक्रमासाठी पाण्याचा टँकर बोलावला होता.

वडीलांचे प्रसंगावधान अन्‌ मुलगा बचावला

टँकरचालकाने आवाज दिला. त्यावेळी अर्थव हा गच्चीवरून खाली डोकावून पाहत असतांना घराच्या समोरून गेलेल्या उच्च दाबाची विद्यूत तारेला त्याच्या हाताचा धक्का (Electric Shock) लागला. त्यावेळी केशव पाटील हे त्याच्या मागेच होते. विजेचा धक्का लागताच केशव पाटील यांनी कॉटवरील उशीच्या सहाय्याने अथर्वला ढकलले. त्यामुळे अथर्व बाजूला पडला व केशव हे विरूध्द दिशने पडले. वडीलांच्‍या प्रसंगवधानाने अथर्व बचावला. दरम्यान या घटनेत अथर्वचा उजवा हात पुर्णपणे जळाल्याने निकामी झाला. तर उजव्‍या पायाच्‍या मांडीवर गंभीर जखम झाली आहे. त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अथर्वचा उजवाच हात निकामी झाल्याने मोठे संकट पाटील कुटुंबावर कोसळले आहे.

गुन्‍हा दाखलची मागणी

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मुलाच्या हाताचे नुकसान झाले असल्याचा आरोप केशव पाटील यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा; अशी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना देण्यात आले आहे. शिवाय मुलाच्या नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने द्यावी अशी देखील मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com