Beed: गर्भपाताच्या औषधाची अवैध विक्री; बोगस मेडिकल चालकावर गुन्हा

गर्भपाताच्या औषधाची अवैध विक्री; बोगस मेडिकल चालकावर गुन्हा
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : बीडच्या आष्टी शहरात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री करणाऱ्या बोगस मेडिकल दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. यावेळी आठ हजार रुपयांची औषधे जप्त करण्यात आले असून मेडिकल (Beed News) चालकावर गुन्‍हा दाखल केला आहे. (beed news Illegal sale of abortion drugs Crime on bogus medical shop)

Beed News
फडणवीसांपासून दूर रहा; ट्विट करत अनिल गोटेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलीसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार आष्टी शहरात मेडिकलचा परवाना नसतानाही विघ्नहर्ता एजन्सी नावाचा फलक लावून, त्या दुकानावर गर्भपाताची औषधी विक्री केली जात होती. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळली होती. यावरून औषध निरीक्षक विलास दुसाने यांनी टीमसह बोगस मेडिकलवर छापा टाकला. यादरम्यान त्या मेडिकलमध्ये गर्भपातासाठी वापरली जाणारी एमटीपी किटस्‌ची बेकायदेशीर विक्री केल्याचे उघडकीस आले.

चिठ्ठीशिवाय चढ्या दराने विक्री

डॉक्टरांच्या (Doctor) चिठ्ठीशिवाय चढ्या दराने औषधी विक्री केल्याचे देखील निष्पन्न झाले. तर यावेळी गर्भपाताची 8 हजार रुपयांची औषधी देखील मिळून आले. विशेष म्हणजे विघ्नहर्ता मेडिकलचा परवाना नसताना विघ्नहर्ता एजन्सी असा फलक लावून औषधी विक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात औषधी विक्रेता बिभीषण आण्णासाहेब पडोळे (रा. आष्टी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com