अंगारकी चतुर्थी; पद्मालय गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अंगारिका चतुर्थी; पद्मालय गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Angarika Chaturthi
Angarika ChaturthiSaam tv
Published On

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या गणपतीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालय गणपती मंदिरात अंगारिका चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सकाळपासूनच पद्मालय परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. (jalgaon news Angarika Chaturthi Crowd of devotees for darshan at Padmalaya Ganapati temple)

कोरोना (Corona) काळानंतर प्रथमच अंगारिका चतुर्थीचा योग आला आहे. यामुळे पद्मालय येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पद्मालय गणपती मंदिरात गणपतीच्या दोन प्रवाळ मुर्त्या असून मंदिरासमोर असलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात कमळाची फुले आहेत. त्यामुळे पद्मालय गणपती म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. पद्मालय गणपती हा भाविकांची इच्छापूर्ती करणारा गणपती असल्याची श्रद्धा भाविकांचे असल्याने राज्यभरातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com