soldier Death
soldier Death

सुटीवर आलेल्‍या जवानाचा दुसऱ्या दिवशी अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

सुटीवर आलेल्‍या जवानाचा दुसऱ्या दिवशी अपघात; उपचारादरम्यान मृत्यू
Published on

पारोळा (जळगाव) : सुटीवर आलेल्‍या आर्मीमधील जवान यांचा ९ डिसेंबरला मोटर सायकल अपघात झाला होता. त्‍यांच्‍यावर धुळे (Dhule) येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला. त्यांच्‍यावर आज टेहू (ता.पारोळा) येथे शासकीय इतमात अंत्‍यसंस्‍कार होणार आहे. (jalgaon-news-Accident-of-a-soldier-on-leave-the-next-day-Death-during-treatment)

soldier Death
बापाचे छत्र हरपले..पण लग्‍न मंडपात मृत वडीलांचा पुतळा उभारून आशीर्वाद

टेहू (ता. पारोळा) येथील आर्मी सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले नंदू संजय पाटील (वय ३० हे ८ डिसेंबरला सुट्टीवर गावी आले होते. सुटीवर आल्‍यानंतर दुसऱ्या दिवशी ९ डिसेंबरला वाघरे (ता. पारोळा) येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त जात असताना टेहु ते वाघरे रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास समोरून एका वाहनाने त्याच्या मोटरसायकलला कट मारला. यात त्याची मोटरसायकल खाली पडून ते जखमी झाले. यानंतर त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना १२ डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

दहा वर्षांपासून सेवेत

गेल्या दहा वर्षापासून सैन्य दलात कार्यरत असून नायक म्हणून कार्यरत होते. २१६ बटालियनमध्ये ते होते. सध्या जबलपूर येथे सेवेत होते. त्याच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन व चार वर्षाचे दोन मुले आहेत. तसेच एक अविवाहित भाऊ असून ते देखील आर्मीमध्ये नोकरीला आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास शासकीय इतमात त्यांच्यावर टेहू ता. पारोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com