जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मोफत बूस्टर डोस मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर दिलेल्या उद्दिष्टापैकी १३.६६ टक्के बूस्टर तर ६६.३० टक्के १२ ते १४ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना पहिल्या व दूसऱ्या लसीचा (Corona Vaccination) लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. (Jalgaon News Corona Vaccination)
जानेवारीपासून बूस्टर प्रिकॉशन लसीकरण (Jalgaon) मोहीम प्राथमिक स्तरावर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, साठ वर्षे वयोगटावरील नागरिक, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पंचेचाळीस ते साठ वर्ष, १८ ते ४४ असे टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जुलैपासून सर्व आरोग्य केंद्रांवर सप्टेंबरअखेर मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अजूनही पाच लाख नागरीक बाकी
जिल्ह्यात ग्रामीण तालुका भागात १३ लाख ९३ हजार ६९८ तर मनपा स्तरावर १लाख ७० हजार १५२ असे एकूण १५ लाख ६३ हजार ८५० लसीकरण पात्र नागरिकांसाठी बूस्टर डोसचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत १८ ते ५९ वयोगटात ६३ हजार ४८१ तर ६० वर्षे वयोगटावरील १ लाख २ हजार २२६ नागरिकांचे बूस्टर डोस लसीकरण पूर्ण झाले आहे. ५ लाख नागरिकांनी लसीकरणाचा एकही डोस घेतलाच नसल्याचे देखिल जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
संपूर्ण लसीकरण आवश्यकच
जिल्ह्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण लसीकरण हाच एक प्रतिबंधात्मक उपाय असून वेळोवेळी लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. सद्यःस्थितीत भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त १५ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान ७५ दिवस सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी मोफत बूस्टर डोस लसीकरण अभियान राबविले जात आहे. शाळा, महाविद्यालयीन स्तरावर नियमित तसेच प्रिकॉशन डोसच्या लसीकरणासाठी प्रबोधन केले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.