Jalgaon: करंजी बुद्रुक येथे निसर्गाचा प्रकोप; ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे कुटुंब रस्त्यावर

करंजी बुद्रुक येथे निसर्गाचा प्रकोप; ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे कुटुंब रस्त्यावर
Jalgaon Heavy Rain
Jalgaon Heavy RainSaam tv
Published On

पारोळा (जळगाव) : करंजी बु. (ता. पारोळा) येथे मध्‍यरात्री बारा ते दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. यात आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस (Heavy Rain) झाल्यामुळे गरीब कुटुंब रस्त्यावर आल्याची वेळ आली आहे. (Jalgaon News Parola Heavy Rain)

Jalgaon Heavy Rain
Congress: महागाई धोरणा विरोधात धुळ्यात काँग्रेसकडून निषेध

मागील आठ दहा दिवसांपासून पावसाने पारोळा (Parola) तालुक्याकडे दडी मारली होती. मात्र 5 ऑगस्‍टच्‍या मध्यरात्रीच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच करंजी बु. येथे ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे घरातील मातीच्या भिंती कोसळल्या. यामुळे घरातील संसार उपयोग वस्तू, अन्नधान्य, कपडे मातीमोल झाले. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, यात गरीब वस्तीतील (Jalgaon) कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या. तर बकऱ्यांची दुखापत झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

३० घरांचे नुकसान

दरम्यान ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे परिसरातील 25 ते 30 घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मात्र जीवित हानी झाली नाही. सदर घटनेची माहिती कळताच तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत गरीब वस्तीतील लोकांना दिलासा दिला. यावेळी सरपंच भैय्यासाहेब रोकडे, तलाठी प्रशांत निकम, ग्रामसेविका वैशाली पाटील, पोलीस पाटील कल्पना पाटील, ग्रामपंचायत सदस्य हे परिसरातील पंचनामा‌कामी सहकार्य करीत आहे. दरम्यान गरीब वस्तीतील कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांसह सरपंच, सदस्य करीत आहेत. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार अनिल गवांदे यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळावी; यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com