खानदेशात तपासणीत सापडले ५१०३ वीजचोर

खानदेशात तपासणीत सापडले ५१०३ वीजचोर
वीजचोर
वीजचोर
Published On

जळगाव : जळगाव परिमंडळात अर्थात, खानदेशात आठ महिन्यांत पाच हजार १०३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी ५५ लाख नऊ हजार ५७४ युनिटची सात कोटी ५३ लाखांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. यात वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे. (jalgaon-news-5103-electricity-theft-found-in-Khandesh-mahavitaran-fir)

वीजचोर
Breaking : नागपूरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; प्रशासनाने जारी केली नवी कोरोना नियमावली

जळगाव (Jalgaon), धुळे व नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांत वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणतर्फे (Mahavitaran) मोहीम राबविण्यात येत आहेत. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. जळगाव परिमंडळात एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.

२०१ अनधिकृत जोडण्या

जळगाव जिल्ह्यात तीन हजार ६८० प्रकरणांत ४१ लाख ५२ हजार ६१० युनिटची पाच कोटी ४२ लाख, धुळे (Dhule) जिल्ह्यात ८०३ प्रकरणांत सहा लाख ५९ हजार ७०७ युनिटची ९१ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यात ६२० प्रकरणांत सहा लाख ९७ हजार २५७ युनिटची एक कोटी २० लाखांची वीजचोरी महावितरणच्या मोहिमांत निदर्शनास आली. एकूण पाच हजार १०३ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची २०१ प्रकरणे उघडकीस आली, तर आकडा टाकून थेट वीज चोरल्याची दोन हजार २२६ प्रकरणे, तर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याची दोन हजार ६७६ प्रकरणे आहेत. या सर्व ग्राहकांना सात कोटी ५३ लाख रुपये वीजचोरीची बिले देण्यात आली.

बिले न भरणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हे

दरम्यान, खानदेशात सापडलेली पाच हजार १०३ प्रकरणांपैकी केवळ एक हजार ३९७ प्रकरणांमध्ये ग्राहकांनी वीजचोरीची बिले व तडजोड शुल्क भरले आहे. ज्या ग्राहकांना महावितरणने वीजचोरीची बिले दिली; त्यांनी ती तातडीने भरावीत. अन्यथा या ग्राहकांविरोधात थेट पोलिसांत गुन्हे नोंदवले जातील, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. आठ महिन्यांत ३८ प्रकरणांमध्ये महावितरणने गुन्हे नोंदवले आहेत. वीजचोरी विरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊन विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com