Breaking : नागपूरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; प्रशासनाने जारी केली नवी कोरोना नियमावली

प्रशासनाने नागपूरात (Nagpur) आजपासून कोरोना नियम कडक केले असून शहरात आजपासून नवीन नियमावली जारी केली आहे.
Breaking : नागपूरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; प्रशासनाने जारी केली नवी कोरोना नियमावली
Breaking : नागपूरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; प्रशासनाने जारी केली नवी कोरोना नियमावलीSaam Tv
Published On

नागपूर : नागपूरात कोरोनाचा प्रसार वाढतानाच दिसत आहे त्यामुळे ऐन नववर्षाच्या तोंडावरती नागपूरकरांची चिंता वाढली आहे. नागपूरात जवळपास मागील सहा महिन्यानंतर एकाच दिवशी 32 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने नागपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Breaking : नागपूरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; प्रशासनाने जारी केली नवी कोरोना नियमावली
अकोल्यात ओमीक्रॉनचा शिरकाव; दुबईवरून आलेली तरुणी निघाली पॉझिटिव्ह!

व्हीएनआयटीच्या (VNIT) चार विद्यार्थ्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली असून एक विद्यार्थी पॅाझीटीव्ह आल्यावर इतर 500 विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली. दरम्यान लागण झालेले व्हीएनआयटीचे चार विद्यार्थी विलीगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा आता शंभरी पार गेलेला आहे तर जिल्ह्यातील कोरोना पॅाझीटीव्हीटी दर एक टक्क्यावर आला आहे. त्यामुळे आता नागपूरकरांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आणि कोरोनाचे नियम काटेकोर पाळावे लागणार आहेत.

हे देखील पहा -

असे आहेत नवे नियम -

याच पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने नागपूरात (Nagpur) आजपासून कोरोना नियम कडक केले असून शहरात आजपासून नवीन नियमावली जारी केली आहे. ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी, तर रात्री 9 नंतर अत्यावश्यक सेवेची दुकानं वगळता इतर सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश चित्रपटगृह, हॉटेल्स (Hotels) आणि बार ला 50 टक्के क्षमतेसह रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असून लग्न समारंभांना सुद्धा रात्री 9 पर्यंतच परवानगी आहे शिवाय सभागृहात 100 तर मोकळ्या जागेत 250 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com