Bribe Trap : वीजपुरवठा जोडून देण्यासाठी २० हजाराची लाच; वायरमन एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : जळगाव शहरातील संभाजीनगर परिसरातील तक्रारदारांच्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या घरासाठी नवीन खांब टाकला होता. त्या खांबावरून वीजपुरवठा मिळण्यासाठी तक्रारदार शिरसोली येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला
Bribe Trap
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरसोली युनिटचे वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. याप्रकरणात शिरसोली युनिटच्या ज्युनिअर इंजिनिअरचे नावही समोर येत असून लाचखोरीचा झटका त्यांनाही बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील संभाजीनगर परिसरातील तक्रारदारांच्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या घरासाठी नवीन खांब टाकला होता. त्या खांबावरून वीजपुरवठा मिळण्यासाठी तक्रारदार शिरसोली येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी ते गेले असता संशयित वायरमन विक्रांत पाटील याने काम करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची (Bribe Trap) मागणी केली होती. यापैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते. तरीही वीजपुरवठा मिळत नव्हता. त्यासाठी उर्वरित २० हजार रुपयांची मागणी होत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) १८ ऑक्टोबरला तक्रार दिली होती. 

Bribe Trap
Uddhav Thackeray : गद्दाराला गाडा अन नांदेड उत्तरमध्ये मशाल पेटवा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

तक्रारीची दखल घेत अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलबाहेर विक्रांत पाटील याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली असून अटकेतील संशयिताला जिल्‍हा न्यायालयात हजर केले. यावेळी या लाच प्रकरणात संबंधित वायरमनचा ज्युनिअर इंजिनिअर सपकाळे यांचा देखील उल्लेख आला असून लाच प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीसाठी संशयिताच्या कोठडीची मागणी सरकारपक्षाने केली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com