जळगाव : घरपट्टी कराची थकित १२ हजार २७८ रूपयाची थकित रक्कम भरण्यासाठी एका किराणा दुकानदाराने चक्क एक, दोन व पाच रूपयांची चिल्लरच महापालिकेत आणली. त्यामुळे महापालिकेत (Jalgaon Corporation) खळबळ उडाली. अखेर तीस तास चिल्लर मोजून ती जमा करण्यात आली. (jalgaon news 12 thousand chiller to fill the house lease)
जळगाव (Jalgaon) येथील मोहन तिवारी यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे महापालिकेच्या घरपट्टी कराची १२ हजार २७८ रूपये रक्कम थकित होती. मात्र, कोरोना काळात व्यवसाय ठप्प होता. त्या काळात त्यांना व्यवसायातून जेमतेम रक्कम उपलब्ध होत होती. त्यातून त्यांनी ती जमा केली होती. त्यात बहुतांश चिल्लरच होती. अखेर महापालिकेची थकित रक्कम भरण्यसाठी ती चिल्लरच घेवून ते महापालिकेत आले.
मोजण्यासाठी तब्बल सहा कर्मचारी
महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर ताण आला. परंतु, नियमाप्रमाणे थकित रक्कम जमा करावयाची असल्याने त्यांनी ही चिल्लर मोजण्यासाठी तब्बल सहा कर्मचारी कामाला लावले. तब्बल तीन ते चार तासानंतर ही चिल्लर मोजून झाली. त्यानंतर तिवारी यांना भरण्याची रितसर पावती महापालिकेतर्फे देण्यात आली
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.