Jalgaon News: ‘मुड ऑफ’च्‍या स्‍टेटस्‌नंतर रात्रीत बदलले स्‍टेटस्‌; दुसऱ्या दिवशी भावाला फोन केला अन्‌..

भावाला फोन करून म्‍हटला..तुला सोडून जातोय; स्‍वतःलाच स्‍टेटस्‌वर श्रद्धांजली अन्‌
Jalgaon Jamner News
Jalgaon Jamner NewsSaam tv

जळगाव : नेरी (ता. जामनेर) गावातील तरुणाने स्वत:लाच व्हॉट्सअॅप स्टेटसवर श्रद्धांजली वाहत जीवनयात्रा संपविल्‍याची धक्‍कादायक (Jalgaon News) घटना घडली. सदर घटना रविवारी दुपारी घडली. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. (Maharashtra News)

नेरी बु. (ता.जामनेर) येथे ऋषीकेश हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ऋषीकेशने व्हॉट्सअॅप स्टेटसवर मूड ऑफ असे स्टेटस ठेवले. शनिवारी रात्री गावातील सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमात ऋषिकेश याने सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले. त्यानंतर त्याने चुलत भाऊ प्रदीप खोडपे यास फोन करत मी तुला सोडून जात आहे.. असे सांगितले.

Jalgaon Jamner News
Dhule Corporation News: बदली सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या; महिला सफाई कर्मचारी मंचतर्फे निदर्शने

भाऊ पोहचला तोपर्यंत..

ऋषिकेश याने सांगितल्‍यानुसार प्रदीप हा त्या ठिकाणी पोहचला. यावेळी ऋषिकेश हा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी ऋषिकेश यास खाली उतरवून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com