Jalgaon News: कामावर न जाता तरूणाने वाटेतच संपविले जीवन

कामावर न जाता वाटेतच जीवन संपविले
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

तोंडापूर (जळगाव) : पहूर कसबे येथील २३ वर्षीय तरुणाने वायरचा गळफास करून जीवनयात्रा (Jalgaon News) संपविण्याची घटना पळसखेडा (ता . सोयगांव) शिवारात घडली. डॉ. स्वप्निल घोडे यांनी दिलेल्या खबरीवरून सोयगाव पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

Jalgaon News
Nandurbar Bribe Case: रेशनकार्डसाठी हजार रुपयांची लाच; संगणक चालकासह दोघांविरुध्द गुन्हा

अक्षय संतोष सोनवणे हा तरुण पळसखेडा (छत्रपती संभाजीनगर) येथील आत्या चंदाबाई क्षीरसागर यांच्याकडे मजुरी करण्यासाठी राहत होता. अधून-मधून तो गावी पहूरला यायचा. दरम्‍यान बुधवारी (१७ मे) सकाळी साडेसहाला मजूरीवर न जाता तो पहूरला गावी जातो; असे सांगून आत्याच्या घरून निघाला. मात्र तो पहूरला पोहोचलाच नाही. वाटेतच पळसखेडा शिवारातील संतोष बोऱ्हाडे यांच्या शेतात विजेच्या खांबाला वायरचा गळफास करून त्याने मृत्यूला कवटाळले.

Jalgaon News
Jalgaon Accident News: लग्नमंडपात पसरली शोककळा; पित्याचा मृत्य, तरुण मुलगा जखमी

आत्महत्येचा पाचवा प्रयत्न

अक्षयने या अगोदरही चार वेळा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कधी भावाने तर कधी शेजारच्यांनी त्याला यातून बाहेर काढले होते. आज मात्र त्‍याने आत्‍महत्‍येचा केलेला प्रयत्‍न अखेरचा ठरला. अक्षयच्या अकाली जाण्याने विधवा आईवर दुःखाचा डोंगरच कोसळला. सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निलेश लोखंडे करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com