Dharangaon News
Dharangaon NewsSaam tv

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

Jalgaon News : कीर्तन सप्ताहाची समाप्ती असल्याने यानिमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम होता. निवृत्तीने सप्ताह कार्यक्रमात जेवण केले. यानंतर तो गावातील पंधरा ते वीस मित्रांसोबत पळासखेडा रस्त्यालगच्या एका शेतातील विहिरीत पोहायला गेला
Published on

धरणगाव (जळगाव) : गावात महाप्रसाद घेऊन गावातील मित्र पोहण्यासाठी गेले होते. सर्वानी विहिरीत उडी मारली. सर्वच बाहेर निघाले. मात्र त्यांच्यातील एक तरुणाला बाहेर निघत ना आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावात घडली. 

भवरखेडे (ता. धरणगाव) येथील निवृत्ती श्यामकांत पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावात कीर्तन सप्ताह आयोजित (Dharangaon News) करण्यात आलेल्या होता. कीर्तन सप्ताहाची समाप्ती असल्याने यानिमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम होता. निवृत्तीने सप्ताह कार्यक्रमात जेवण केले. यानंतर तो गावातील पंधरा ते वीस मित्रांसोबत शेतातील विहिरीत पोहायला गेला. निवृत्तीला पोहता येत नव्हते, तरी देखील मित्र विहिरीत पोहत असल्याचे पाहून त्याने पाण्यात उडी मारली. परंतु विहीर पन्नास फूट खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला. 

Dharangaon News
Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

विहिरीतील पाणी उपसून मृतदेह काढला बाहेर 

सोबतच्या मित्रांनी घटनेबाबत गावात माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जात शोध घेण्यास सुरवात केली. विहिरीत पन्नास फुटांपर्यंत पाणी असल्याने निवृत्तीचा पाण्यात शोध घेणे कठीण जात होते. यानंतर चार वीजपंपांच्या सहाय्याने विहिरीचे सर्व पाणी बाहेर काढून सहा तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. धरणगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. निवृत्तीच्या कुटुंबास आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com