स्‍त्री असल्‍याचे भासवून चॅटींग; नंतर अश्‍लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल

स्‍त्री असल्‍याचे भासवून चॅटींग; नंतर अश्‍लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

जळगाव : व्हॉटसॲपवर चॅटींग करून अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत भुसावळ येथील एकाची १० हजार ५८० रूपयांची ऑनलाईन ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताला सायबर पोलीसांनी (Police) हरीयाणातून अटक केली आहे. (jalgaon cyber crime news blackmail by sending videos)

Cyber Crime
Nandurbar: ढोरपाडा लघु मध्यम प्रकल्प ओवर फ्लो

मुरसलिम आशू मोहम्मद (रा. गागडबास मेवात, हरीयाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. भुसावळ (Bhusawal) येथील तक्रादारास १८ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या व्हॉटसॲप नंबरवर संशयिताने स्त्री असल्याचे भासवून (Jalgaon News) चॅटींग सुरु केली. त्यानंतर संशयिताने तक्रारदार यांच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठविला. त्यानंतर तक्रारदार यांचे काही फोटो घेवून स्त्रीसोबत व्हिडीओ बनविला आणि सोशल मिडीयात व्हायरल (Cyber Crime) करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.

घाबरून पाठविले साडेदहा हजार रूपये

तक्रारदार यांनी घाबरून दिलेल्या बँक अकाऊंटवर १० हजार ५८० रूपये पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी (ता.१९) सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलीसांनी तांत्रिक तपासात संशयित आरोपी हा हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. मिलींद जाधव, ललित नारखडे, संदीप नन्नवरे यांनी संशयित आरोपी मुरसलिम आशू मोहम्मद (रा. गागडबास मेवात, हरीयाणा) याला हरियानातून शुक्रवारी ८ जुलै रोजी अटक केली. याप्रकरणी रविवारी १० जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील १० हजार ५८० रूपयांची रक्कम हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com