Crime: चाळीस वर्षीय इसमाची हत्‍या; पहाटेच्‍या घटनेने यावल परिसरात खळबळ

चाळीस वर्षीय इसमाची हत्‍या; पहाटेच्‍या यावल घटनेने परिसरात खळबळ
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv
Published On

यावल (जळगाव) : तालुक्यातील चितोडा येथील एका ४० वर्षीय इसमाचा अतिशय क्रूर पद्धतीने खून झाल्याचे आज पहाटे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले असून तपास सुरू आहे. (Jalgaon Yawal Crime News)

Jalgaon Crime News
मोहित कंबोज यांनीच बँकेचे 52 कोटी बुडवले; रोहित पवारांचा पलटवार

यावल (Yawal) तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एकाचा छिन्न- विछिन्न अवस्थेत मृतदेह (Crime News) आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. यात मृत व्यक्ती हा मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असून तो चितोडा येथील रहिवासी असल्याचे (Jalgaon) निष्पन्न झाले आहे. मनोज भंगाळे हे शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.

वाहनाला बांधून ओढत आणले

मारेकऱ्यांनी अतिशय क्रूर पद्धतीने मनोज भंगाळे यास संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणाऱ्या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. तसेच त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचेही आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. मनोज भंगाळे यांची हत्या नेमकी कोणी व का केली हे प्रश्न अनुत्तरीत असून याविषयी परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मयत मनोज भंगाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com