मोहित कंबोज यांनीच बँकेचे 52 कोटी बुडवले; रोहित पवारांचा पलटवार

मोहित कंबोज यांना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही - रोहित पवार
Rohit Pawar/Mohit Kamboj
Rohit Pawar/Mohit KambojSaam Tv
Published On

बुलडाणा - मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनीच 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याबद्दल भाकीत वर्तवलं होतं. यावर बोलत असताना रोहित पवार यांनी मोहित कंबोज आरोपस्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचा (NCP) मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असे ट्वीट काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केले होते. कंबोज यांच्या या ट्विटने खळबळ उडवून दिली होती.

आमदार रोहित पवार शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मोहित कंबोज यांच्या ट्वीटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, त्यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.

हे देखील पाहा -

सुप्रीम कोर्टातील निर्णय पुढे ढकलून चालणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकशाहीला आणि संविधानाला धरून निर्णय असला पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पवार यांन व्यक्त केली.

सोलापुरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चे आहे. पण, जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीपासून होती त्यांना काहीही मिळालं नाही मात्र उशिरा गेलेल्यांना मंत्रिपदं मिळाली. जास्त भरती केल्याने लोक गुदमरूत आहेत, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला आहे.

Rohit Pawar/Mohit Kamboj
Nashik: गंजमाळ परिसरात दोन गटात तुफान राडा; एकमेकांवर दगडफेक

तसेच यावेळी रोहित पवार यांनी दिल्लीचे आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा निषेध केला. त्यांना उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com