Jalgaon: शिवसेनेविरूद्ध राष्‍ट्रवादीचे आंदोलन

शिवसेनेविरूद्ध राष्‍ट्रवादीचे आंदोलन
Jalgaon NCP
Jalgaon NCPSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी- शिवसेनेचा वाद चांगला चव्हाट्यावर आला आहे. यातच जळगावात आता राष्ट्रवादीच्‍या (NCP) कार्यकत्‍र्यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेने (Shiv Sena) विरुद्ध एकवटले असून आंदोलन छेडले आहे. (jalgaon corporation news NCP agitation against Shiv Sena)

जळगाव (Jalgaon) शहरातील शिवाजीनगर पुलाच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाचा विरोध करत लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रेल्वे (Railway) पुलाचे काम प्रलंबित असून महापालिकेतील (Jalgaon Corporation) सत्ताधारी व प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा जळगावात राष्ट्रवादी व शिवसेना आमने-सामने येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com