Crime: पत्नीला अश्लील बोलल्यावरून वाद; मोठ्या भावाने केला भावाचा खून

पत्नीला अश्लील बोलल्यावरून वाद; मोठ्या भावाने केला भावाचा खून
Crime News Jalgaon
Crime News JalgaonSaam tv
Published On

मेहुणबारे (जळगाव) : दारूच्या नशेत शिवीगाळ करून पत्नीसंबंधी अश्लील बोलल्याचा राग अनावर झाल्याने सख्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात लोखंडी पास टाकून खून (Crime) केल्याची खळबळजनक घटना अभोणे येथे घडली होती. याप्रकरणी मेहूणबारे पोलिस ठाण्यात आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा (Crime News) दाखल झाला आहे. खून करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Jalgaon News Crime)

Crime News Jalgaon
लग्नानंतर सहा महिन्यातच विवाहित तरुणीने संपविले जीवन

सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान सुरेश हा पोळ्यानिमित्त (Bail Pola) गावातून बैल मिरवून घरी आला. तेवढ्यात लहान भाऊ शिवाजीने दारू पिवून सुरेशला शिवीगाळ केली. त्यावेळी सुरेशने त्याला समजावत ‘तु कळमडू येथे घरी जा’ असे सांगितले. मात्र मी आज घरी जाणार नाही, येथेच मुक्काम करणार आहे. पत्नीसंबंधी बोलल्याचा राग आला व संतापलेल्या सुरेशने ओट्यावर पोळानिमित्त पुजेकरीता ठेवलेली लोखंडी पास शिवाजीच्या डोक्यावर, तोंडावर मारली. यात जबर मार लागल्याने शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही वेळाने रूग्णवाहिका आल्यानंतर शिवाजी याला ग्रामीण रूग्णालयात (Hospital) नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी मृत शिवाजीची आई लताबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश पाटील याच्या विरूद्ध मेहूणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत. दरम्यान संशयित आरोपी सुरेश पाटील यास अटक केली आहे. शनिवारी (ता. २७) त्यास चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com