लग्नानंतर सहा महिन्यातच विवाहित तरुणीने संपविले जीवन

लग्नानंतर सहा महिन्यातच विवाहित तरुणीने संपविले जीवन
Akola Suicide Case
Akola Suicide CaseSaam tv
Published On

अकोला : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोला (Akola) जिल्ह्याच्या बोरगांव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील यावलखेड़ इथे घडली आहे. दर्शना प्रशांत पवार (वय २४, रा. बालाजी नगर, कात्रज, पुणे) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस (Police) ठाण्यात सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त (Crime) केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. सध्या सासरकड़ील सर्व मंडळी सध्या फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. (Akola News Crime Suicide Case)

Akola Suicide Case
Jalgaon: धरणगावनंतर जळगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित

मंगला अरुण सोळंके यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून दर्शना हिचा (Marriage) विवाह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशांत रामकृष्ण पवार (रा. गायगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा, ह.मु. बालाजीनगर, कात्रज, पुणे) याच्याशी झाला होता. प्रशांत एका खाजगी कंपनीत पुण्यात कामाला आहे. तर सासराही पुण्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. दरम्यान माहेरकडून दर्शनाला सोने- चांदीच्‍या दागिन्‍यांसह ४ लाख ५० हजाराचे भेट वस्तू लग्नात देण्यात आल्या. लग्‍नानंतर दर्शना ही तिच्या पतीबरोबर पुणे इथे राहायला गेली. प्रशांतसह वडील रामकृष्ण आणि आई नंदा पवार असे चौघेही एकत्र राहत होते.

त्रास देत दीड लाखासाठी तगादा

काही दिवस चांगले गेले. परंतु, मार्च २०२२ मध्ये छोट्या- छोट्या कारणांवरुन पतीसह सासरच्या मंडळींनी दर्शनाशी वाद घालायला सुरुवात केली. तुझ्या आई- वडिलांनी लग्नांमध्ये पाहुण्यांची काही सोय केली नाही. हलक्या दर्जाच्या वस्तू भेट दिल्या. तू खेळपट मुलगी आहे; असे वारंवार टोमणे द्यायचे अन् मारहाण करायचे. दर्शना हे नेहमी फोनवर सांगायची, असेही तक्रारीत नमूद आहे. यासोबतच तिला माहेरकडून १ लाख ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर माहेरच्यांनी तिला घेऊन अकोल्याच्या यावलखेडमध्ये घरी आणले. तेव्हा तिने झालेला पूर्ण त्रास माहेरच्यांना सांगितला.

सासरच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचे गुन्हे..

प्रशांत पवार व सासरच्यांनी नेहमी दर्शनाला शारिरिक, छळवणूक तसेच तिला घरून पैसे आणण्यासाठी नेहमी तगादा लावला जात होता. नेहमी शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकीही दिली जायाची. तीने तिच्या माहेरच्या लोकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. मात्र माहेरच्यांनी आज ना उद्या तिला सासरचे नांदवतील तसेच परिस्थिती सुधारेल या आशेने तिला समजावून सांगायचे. परंतु दर्शनाचा त्रास कमी न होता वाढत गेला. सासरचे तिला नेहमी नवनविन डिमांड करीत राहीले अन् दर्शना माहेरी असता तिला फोनव्दारे तुला वागवत नाही. तसेच प्रशांत दुसरे लग्न करेल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळच दर्शनाने आत्महत्येचे पाऊल उचलंले. तिने माहेरी यावलखेड़ इथे १९ ऑगस्ट रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. असा आरोप दर्शनाच्या नातेवाईकांनी केलाय. बोरगांव मंजू पोलिसांनी पंचनामा केला असून तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com