Bhusawal News: तापी नदीत पोहायला गेलेल्‍या पाच तरुणांपैकी दोघांचा मृत्यू; तिघांचा वाचला जीव

तापी नदीत पोहायला गेलेल्‍या पाच तरुणांपैकी दोघांचा मृत्यू; तिघांचा वाचला जीव
Jalgaon Bhusawal News
Jalgaon Bhusawal NewsSaam tv

भुसावळ (जळगाव) : तापी नदीच्या लहान पुलाजवळील फरशीजवळ पोहण्यासाठी गेलेले (Tapi River) पाच तरुण पाण्यात बुडाल्यानंतर (Bhusawal) तिघांनी कसाबसा जीव वाचवला. दोन मित्रांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२१ मे) घडली. (Tajya Batmya)

Jalgaon Bhusawal News
Jalgaon Crime News: भयंकर! मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत विवाहितेचा घरात घुसून विनयभंग

भुसावळातील खडका रोडवरील ग्रीन पार्क ३२ खोली भागातील रहिवासी दानिश शेख जब्बार (वय १७) व अंकुश दौलतसिंग ठाकूर (वय १७) दोघे दुपारी दोनच्या सुमारास तापी नदी लहान पुलाजवळील फरशीजवळ पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्याच भागातील तीन युवकही होते. पाचही जण पाण्यात उतरल्यानंतर पोहू लागले. मात्र, काही वेळातच पाचही जण बुडू लागले. आपण पाण्यात बुडत आहोत, हे लक्षात येताच तिघांनी कसाबसा आपला जीव वाचवला व ते पाण्याबाहेर आले.

Jalgaon Bhusawal News
Sambhaji Nagar Bajar Samiti: बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे राधाकिसन पठाडे यांची वर्णी

मात्र आपल्यासोबत असलेले दोघे पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच या तिघांनी घरी येऊन मृत तरुणांच्या परिवाराला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांसह नागरिकांनी तापी नदीवर धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तसेच शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कंखरे व कर्मचारी दाखल झाले. दोघी मृत युवकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com