Tragic Incident : शेतातील पंप सुरू करताना शॉक लागला; तरूण मजुरानं गमावला जीव

Jalgaon News : नेपानगर (जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) येथील मूळ रहिवाशी असून तो मजुरी कामासाठी कुटुंबासह बेहार्डी शिवारातील शेतात वास्तव्याला होता
Electric Shock
Electric ShockSaam tv

भुसावळ (जळगाव) : शेतात काम करत असताना पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीतील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (Bhusawal) भुसावळ तालुक्यातील बोहार्डी शिवारात घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Electric Shock
Kalyan Crime News : पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षाची चोरी; नंबर बदलल्याने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

बोहार्डी (ता. भुसावळ) येथे वास्तव्यास असलेला सुनिल हरसिंग आकाडे (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुनील आकाडे हा नेपानगर (जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) येथील मूळ रहिवाशी असून तो मजुरी कामासाठी (Jalgaon) कुटुंबासह बेहार्डी शिवारातील शेतात वास्तव्याला होता. शेतातील कामे करून तो उदरनिर्वाह करत होता. दरम्यान ९ एप्रिलला दुपारी विहीरीत पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला (Electric Shock) विजेचा जोरदार धक्का बसला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Electric Shock
Pune Cyber Crime : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख पडली महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाख रुपयांत फसवणूक

विजेचा झटका बसल्याने सुनील हा फेकला गेला. यात तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com