Amalner Crime : अख्खं कुटुंब लग्नाला गेलं होतं, संध्याकाळी परतले; घरातलं दृश्य बघून हादराच बसला

Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील मांजर्डी येथील सुकलाल भीमराव बिऱ्हाडे हे कुटुंबासह २१ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घर बंद करून दोंडाईचा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते
Amalner Crime
Amalner CrimeSaam tv
Published On

जळगाव : बंद घर पाहून चोरटे संधी साधत आहेत. सध्या लग्नसराई असल्याने कुटुंब घर बंद करून जात असतात. अशाच प्रकारे नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना अमळनेर तालुक्यात समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. 

अमळनेर तालुक्यातील मांजर्डी येथील सुकलाल भीमराव बिऱ्हाडे हे कुटुंबासह २१ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घर बंद करून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न सोहळा आटोपून बिऱ्हाडे कुटुंब २३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता घरी परत आले, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. यावेळी घरात चोरी झाल्याचे उघड झाले. 

Amalner Crime
Nylon Manja : बंदी असतानाही नायलॉन मांजा विक्री; अहिल्यानगर जिल्ह्यात १८ गुन्हे दाखल

दरम्यान घरातील किचनमधील धान्याच्या कोठीतील ४० हजार रुपये रोख आणि ९ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम सोन्याचे कर्णफुले, ६ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र दिसून आले नाही. या प्रकरणी सुकलाल बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरात झालेल्या चोरीचा तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

Amalner Crime
Vegetable Price : नवीन लसणाची आवक वाढली; दरात घसरण, भाजीपाल्याचे दरही झाले कमी

धुळ्यात चैन स्नॅचिंग करणाऱ्यांचा धुमाकूळ
धुळे
: साक्री रोडवरील अतिशय दाट लोकवस्तीच्या कुमार नगरात दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोन पोत लांबविली. या सर्व चोरीच्या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे महिला वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून चेन स्कॅचिंगची घटना पुन्हा घडू लागलेल्या आहेत, वडजाई रोडवरील उड्डाणपुलाजवळ एका इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा साक्री रोडवरील अतिशय गजबजलेल्या कुमारनगरात काल रात्री अशीच काहीसी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्रमालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com