Accident : २ दुचाकीची एकाच वेळी टॅक्सीला धडक, ३ जणांचा मृत्यू, जळगावात भीषण अपघात

Amalner Accident : शनिवारी रात्री जळगावमध्ये भीषण अपघात झालाय. दोन दुचाकीने समोरून आलेल्या टॅक्सीला धडक दिली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय. तर चार जण जखमी आहेत.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

संजय महाजन, साम टीव्ही प्रतिनिधी

Jalgaon Amalner Accident : जळगावमधील दहीवद फाट्याजवळ भीषण अपघात झालाय. शनिवारी रात्री दोन दुचाकी ओमीनी गाडीला धडकल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील अमळनेर तालुक्यातील दहीवद येथे शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन भरधाव दुचाकीने समोरून आलेल्या ओमीनी टॅक्सीला धडक दिली. या भीषण अपघातात चोपडा येथील तीन तरुणांचा मृत्यू झालाय. तर टॅक्सीचालकासह चार जण यामध्ये जखमी झाले आहेत.

या अपघातात शुभम ओंकार पारधी, विजय बाळू पाटील आणि केवाराम पावरा या तीन जणांचा मृत्यू झालाय. हे सर्वजण चोपडा येथील रहिवाशी होते. चोपडा येथील सहाजण मंगरूळ (ता. अमळनेर) येथे केटरर्सच्या कामासाठी दुचाकीवर आले होते. काम आटोपून दोन दुचाकीवरून सर्वजण चोपड्याकडे निघाले होते. त्याचवेळी दहीवदजवळ अंदाज न आल्याने समोरून आलेल्या टॅक्सीला धडकल्या.

या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जातेय. सूरतमधील ज्ञानेश्वर सोनार याला डॉ सुमित सुर्यवंशी यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका जखमीला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर इतर दोन जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com