Varangaon News: पुराच्या पाण्यात मोटारसायकलसह वाहून गेला तरुण; ड्युटीवर जात असताना झाला घात, आईचा आधार गेला

Jalgaon News : पुराच्या पाण्यात मोटारसायकलसह वाहून गेला तरुण; ड्युटीवर जात असताना झाला घात, आईचा आधार गेला
Varangaon News
Varangaon NewsSaam tv
Published On

वरणगाव (जळगाव) : वरणगाव आणि परीसरात रात्री पासुन सततधार पावसामुळे आयुध निर्माणीकडे (Jalgaon) जाणाऱ्या लवकी नाल्याला आलेल्या पुरात सकाळी ड्युटीवर जात असलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली. यात (Varangaon) त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Breaking Marathi News)

Varangaon News
Jalgaon Crime News : प्रेम प्रकरणाच्या संशयातून खून; ट्रकचालकाच्या खुनाचा उलगडा

भुसावळ येथील शुभम बबलु तायडे (वय २३) असे तरुणाचे नाव आहे. वरणगाव आणि परीसरात शनिवार रात्रीपासुन पावसाची (Rain) संततधार सुरु होती. यामुळे नदी, नाले तुडूंब वाहत होते. सुटीचा दिवस रविवार असल्याने शुभम तायडे आयुध निर्माणीमध्ये दरबान म्हणुन नोकरीवर असल्याने त्याला ड्युटी होती. सकाळी भुसावळ आनंदनगर येथुन नित्यनियमाप्रमाणे मोटरसायकलने कामावर निघाला. मात्र वरणगाव शहराबाहेर एक किमी अंतरावर असलेल्या लवकी नाल्यावरील पुलावरुन पुराचे पाणी ओसंडुन वाहत होते. दरम्यान या तरुणाने मोटरसाइकलसह पुल पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोटरसायकलसह तो वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. 

Varangaon News
Kalyan News : सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत; चार जणांना अटक

तरुण वाहून गेल्याची माहिती समजताच आयुध निर्माणीचे जनरल मॅनेजर अजयकुमार, कर्नल वैद्य, कर्नल चौधरी, अॅडली ऑफीसर. मीना, आयुध निर्माणी युनियनचे महेश पाटील, योगेश सुर्यवंशी, रवि सपकाळे आणि दरबान कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. घडलेल्या घटनेची माहिती वरणगाव पोलिस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर नाल्याच्या दोन्ही काठावरून तरुणाचा शोध घेण्यात आला. परंतु पाच तास शोध लागला नाही. शहरातील पट्टीचे पोहणारे राजेंद्र माळी यांनी नाल्यातील वाहत्या पाण्यात जाऊन शोध घेतला असता अवघ्या १०० मीटर अंतरावर शुभमचा मृतदेह काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वरणगाव ग्रामिण रुग्णालयात आणला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com